अपघातात मृत पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांचे पोलीस आयुक्तांनी केले सांत्वन …!
लाल दिवा-नाशिकरोड,ता.२२ : देवळाली कॅम्प पोलीस ठाणे कडील नेमणुकीचे सपोनी कुंदन लक्ष्मण सोनोने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथून त्यांची मोटार सायकल क्रमांक MH 15 CY4140 यावरून देवळाली कॅम्प ते वडनेर रोडमार्गे राहत्या घरी जात असताना आर्मी एरिया येथील इंडियन पेट्रोल पंप समोर 17:30 वाजेच्या सुमारास आर्मी ची गाडी व मोटरसायकल यात अपघात होऊन जखमी झाल्याने उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटल येथे दाखल केले असता मयत झाले आहे..
मा. श्री संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्रीमती मोनिका राऊत,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, नाशिक शहर व मा. श्री आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक रोड विभाग यांनी यांनी स्वतः मिलिटरी हॉस्पिटल, देवळाली कॅम्प येथे सपोनी सोनवणे यांचे नातेवाईकास भेटून त्यांचे सांत्वन केले आहे….
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1