पोलीस अधिकारी अंमलदारासाठी ताणतणाव नियोजन व मानसिक आरोग्य कार्यशाळेचे नियोजन….!
लाल दिवा : संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर व डॉक्टर श्री. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक शहर,
यांचे मार्गदर्शनाखाली, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, नाशिक शहर यांचे वतीने, पोलीसांकरीता प्रशिक्षण “ताणतणाव नियोजन व मानसिक आरोग्य कायदा २०१७” चे अनुषंगाने पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावित असतांना मानसिक आरोग्य चांगले रहावे व त्यांचे स्वास्थ्या करीता नाशिक शहर पोलीस आयुक्तालया तर्फे दि. १९/०३/२०२४ रोजी १०.०० ते १३.०० वा. या वेळेत पाम शेल्स, मल्टीक्युसिन रेस्टॉरन्ट हॉटेल, के. के. घुगे इस्टेट, गंगापुर मखमलाबाद लिंक, नाशिक येथे ताणतणाव नियोजन व मानसिक आरोग्य कायदा २०१७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाकरीता तज्ञ डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. स्वाती चव्हाण, मानसोपचार तज्ञ विभाग प्रमुख, डॉ. निलेश जेजुरकर, मानसोपचार तज्ञ, डॉ. अमोल पुरी, (प्रोग्राम ऑफिसर) मानसोपचार तज्ञ, श्री. पवनकुमार पवार, क्लीनीकल साकॉलॉजिस्ट, श्री. अरविंद पाईकराव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, श्रीमती शितल अहिराव, कम्युनिटी नर्स, श्रीमती कावेरी शिंदे, सायकॅट्री नर्स, श्रीमती वैशाली पाटील, रेकॉर्ड किपर, श्रीमती सिमा ठाकरे, केस रजिस्ट्री सहायक, जिल्हा रुग्णालय, नाशिक शहर यांनी सदर कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानसिक आरोग्य व ताणतणाव याबाबत मार्गदर्शनपर समुपदेशन केले.
कार्यक्रमासाठी लाभलेले तज्ञ यांनी समुपदेशन करतांना मानसिक ताणतणाव आजार याबाबत ओळख होणे आवश्यक असल्याने दृष्टीस येणारे लक्षणांची माहिती दिली. मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन करणेकरीता सामाजिकदृष्ट्या व कौटुंबिकदृष्टया खंबीर असणे आवश्यक असलेबाबत सांगितले. तसेच कामाचे नियोजन व कामाची व्यापकता हे देखिल मानसिक आरोग्यावर परिणाम करते याबाबत माहिती देण्यात आली. कार्यशाळेत उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्य बजावतांना येणारा मानसिक तणाव संदर्भाने उपस्थित केलेले प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रमाकरीता मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-१), नाशिक शहर, सहायक पोलीस आयुक्त श्री. सिध्देश्वर धुमाळ, सरकारवाडा विभाग, पोलीस निरीक्षक, ईरफान शेख, हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास तज्ञ डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. स्वाती चव्हाण, मानसोपचार तज्ञ विभाग प्रमुख, डॉ. निलेश जेजुरकर, मानसोपचार तज्ञ, डॉ. अमोल पुरी, मानसोपचार तज्ञ, श्री. पवनकुमार पवार, साकॉलॉजिस्ट, श्री. अरविंद पाईकराव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, श्रीमती शितल अहिराव, कम्युनिटी नर्स, श्रीमती कावेरी शिंदे, सायकेंट्री नर्स, श्रीमती वैशाली पाटील, रेकॉर्ड किपर, श्रीमती सिमा ठाकरे, केस रजिस्ट्री सहायक, जिल्हा रुग्णालय, नाशिक शहर यांचे स्वागत करून मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-१), नाशिक शहर, यांनी अधिकारी अंमलदार यांचेशी संवाद साधला व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणेतील अधिकारी, अंमलदार यांचेशी संपर्कात राहून संवाद साधावा व त्यांचे अडीअडचणी समजून घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले.