पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन कार्यशाळेचे नियोजन….!
लाल दिवा-नाशिक,ता.२९ : –संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावित असतांना मानसिक आरोग्य चांगले राहावे व त्यांचे स्वास्थ्याकरीता नाशिक पोलीस आयुक्तालय, पोलीस कल्याण/प्रशिक्षण शाखे अंतर्गत दि. २९/०२/२०२४ रोजी १०:३० वा. १७ नं. बॅरेक, भिष्मराज बाम हॉल, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे “मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- सदर कार्यक्रमाकरिता तज्ञ
- १) डॉ. अनुप सुभाष भारती, (एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ.)सध्या कार्यरत- विभाग प्रमुख, (मानसोपचार विभाग) डॉ. वसंतराव पवार वैदयकिय महाविदयालय, नाशिक.
- २) डॉ. मुक्तेश काकासाहेब दौंड, (एम.बी.बी.एस., डी. एन. बी. मानसोपचार तज्ञ व व्यसनमुक्ती तज्ञ.) सध्या कार्यरत- संचालक, निम्स हॉस्पीटल, नाशिक
- ३) डॉ. प्रशांत देवरे
- ४) डॉ. गिरीष देवरे, पोलीस रुग्णालय, नाशिक शहर
यांनी सदर कार्यक्रमा अंतर्गत उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानसिक आरोग्य व ताणतणाव याबाबत मार्गदर्शन पर समुपदेशन केले.
कार्यक्रमासाठी लागलेले तज्ञ यांनी समुदेशन करतांना मानसिक ताणतणाव आजार याबाबत ओळख होणे आवश्यक असल्याने दृष्टीस येणारे लक्षणांची माहिती दिली. मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन करणे करिता सामाजिकदृष्ट्या व कौटुंबिकदृष्टया खंबीर असणे आवश्यक असलेबाबत सांगितले. तसेच कामाचे नियोजन व कामाची व्यापकता हे देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करते याबाबत माहिती देण्यात आली. कार्यशाळेत उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्य बजावतांना येणारा मानसिक तणावा संदर्भाने उपस्थीत केलेले प्रश्न व त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रमाकरिता संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, तसेच किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास डॉ. अनुप सुभाष भारती, (एम.बी.बी.एस., एम.डी. मानसोपचार तज्ञ.) व काकासाहेब दौंड, (एम.बी.बी.एस., डी. एन.बी. मानसोपचार तज्ञ. व व्यसनमुक्ती तज्ञ.) स्वागत करून संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी अधिकारी यांचेशी संवाद साधला व सुचना दिल्या की वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणेतील अधिकारी, अंमलदार यांचेशी संपर्कात राहून संवाद साधावा व त्यांचे अडीअडचणी समजून घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले.