पिंगळे की चुंबळे …… नाशिक बाजारसमितीच्या निकालाकडे लागले संपूर्ण राज्याचे लक्ष !!!
लाल दिवा, ता. २८ : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेची जर कोणती निवडणूक ठरली असेल तर ती म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची होय. शिवाजी चुंबळे विरुद्ध देविदास पिंगळे अशी चुरशीची लढत या दोन पॅनल मध्ये बघायला मिळाली. आमदार हिरामण खोसकर यांना शिवाजी चुंबळे यांचे पुत्र अजिंक्य चुंबळे यांनी फोनवरून दिलेल्या धमकीच्या आरोपावरून तर संपूर्ण राज्यभरात ही निवडणूक चर्चेची ठरली. मविप्र निवडणुकी प्रमाणे या निवडणुकीपूर्वी देखील दस्तर खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा देखील दौरा चर्चेचा ठरला. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण नाशिकचे नव्हे तर राज्यभराचे लक्ष लागून राहिले आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ जागांसाठी ९६.३४ टक्के मतदान झाले असून ३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शनिवारी (दि. २९) सकाळी आठ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
१५ जागांसाठी ३७ उमेदवार
नाशिक बाजार समितीच्या १५ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. तीन जागा अगोदरच बिनविरोध आल्या आहेत. माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील ‘आपलं पॅनल’ आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत आहे.
यात सहकारी संस्थांच्या मतदार संघात ११ पैकी सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी चार, इतर मागासवर्गीय एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती विमुक्त जमाती एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघ चार जागांपैकी सर्वसाधारण दोन जागांसाठी सहा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती एका जागेसाठी दोन, आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी दोन असे एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत.
आपलं पॅनलचे उमेदवार
सोसायटी : सर्वसाधारण गट: देवीदास पिंगळे, संपत सकाळे, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे, तुकाराम पेखळे, उत्तम खांडबहाले, उत्तम आहेर । सोसायटी इतर मागासवर्गीय गट : दिलीप थेटे सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गट : विश्वास सोसायटी महिला गट सविता तुंगार, विजया कांडेकर ग्रामपंचायत सर्वसाधारण गट: जगन्नाथ कटाळे, विनायक माळेकर ■ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट निर्मला कड ■ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटः भास्कर गावित
शेतकरी विकास पॅनल
■ सोसायटी सर्वसाधारण गट शिवाजी चुंभळे, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, नामदेव बुरंगे, प्रभाकर माळोदे, गणेश तथा गणपत चव्हाण, शिवाजी मेढे
सोसायटी इतर मागासवर्गीय गट धनाजी पाटील
■ सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गट प्रल्हाद काकड
सोसायटी महिला गट : कल्पना चुंभळे, शोभा माळोदे
■ ग्रामपंचायत सर्वसाधारण गट: तानाजी गायकर, प्रकाश भोये ॥ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट सदानंद नवले
■ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गट यमुना जाधव