भाग : ४……स्वामी समर्थ प्रकरणातील “त्या” अन्याग्रस्त महिलेच्या न्याय हक्कासाठी…..अखेर सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके सोमवार पासून बसणार जिल्हाधिकारी कार्यालसमोर उपोषणाला……!

लाल दिवा : दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या एका विश्वस्ताला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून एका महिलेस नाशिक शहर पोलीस खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात व स्वामी समर्थ भक्तांमध्ये चर्चा पसरली होती. या प्रकरणात काहीतरी काळे बरे आहे. असा संशय व्यक्त करण्यात आला. त्या महिलेकडे असलेल्या सीडी मध्ये नेमकं दडलंय तरी काय ? तो व्यक्ती व महाराज कोण ? याचा उलगडा मात्र अद्याप पर्यंत होऊ शकला नाही. सदर महिलेला, तिच्या भावाला व मुलाला मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होताना दिसत नव्हता. अखेर महिलेचे वडील यांनी लाल दिव्याशी संपर्क साधून मदतीची याचना केली.

 

भाग पहिला (१)…….श्री समर्थ गुरुपीठाच्या पिठाधिशांनी “त्या” प्रकरणाचा खुलासा करावा…….गजू घोडके https://laldivalive.com/part-first-1-shri-samarth-gurupeethachaya-pithadhishani-got-the-incident-disclosed-gaju-ghodke/

 

भाग दोन (२) :…… श्री समर्थ गुरुपीठाच्या प्रकरणासंदर्भात…… पीडीतेच्या वडिलांनी घेतलेली गजू घोडके यांची भेट…..! https://laldivalive.com/part-two-2-regarding-the-case-of-shri-samarth-gurupeetha-the-gift-of-gaju-ghodke-taken-by-pdts-father/

joint my लाल दिवा live-news

 

 

भाग तिसरा (३)….. सारिका सोनवणे प्रकरणाचा वडील चव्हाण यांनी केला धक्कादायक खुलासा…. श्री स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त व पोलिसांचा केला भांडाफोड……! https://laldivalive.com/part-3-3-shocking-revelation-by-father-chavan-about-sarika-sonawane-case-a-confidant-of-shri-swami-samarth-center-and-a-police-officer/

 

सारिका सोनवणे तक्रार अर्जातील “त्या” व्यक्तीची……. व ….खंडणीची फिर्याद देणाऱ्या निंबा मारुती शिरसाट ची……. चौकशी करून नार्को टेस्ट करा……. गजू घोडके https://laldivalive.com/sarika-sonawane-complaint-arjatil-the-person-who-left-the-place-and-refuted-the-complaint-by-investigating-the-nimba-maruti-shirsat-and-conducting-a-narco-test/

joint my लाल दिवा live-news

सदर प्रकरणाला लाल दिव्याने चांगलीच वाचा फोडली. आणि काही दिवसानंतर ती महिला, भाऊ व मुलगा यांची मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सदर महिलेच्या वडिलांनी व परिवाराने लाल दिव्याचे आभार मानले. परंतु या प्रकरणामागे नेमकं सत्य आहे तरी काय ?

हे मात्र अद्याप पर्यंत बाहेर येऊ शकलं नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी आपल्या जीवाची परवा न करता सदर महिलेला न्याय मिळावा म्हणून वाचा फोडली. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून दस्तर खुद्द नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा व महिलांना न्याय मिळावा असे निवेदन दिले. अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा दिला. मध्यंतरात लोकसभा आचारसहिता असल्यामुळे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी उपोषणाचे शस्त्र म्यान केले होते. आता आचारसंहिता संपल्यामुळे व पोलिसांकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला असून संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे संबंधित दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र व पोलीस प्रशासन नेमके काय भूमिका घेणार यावर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढेच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार व महिलेला न्याय मिळणार अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली असून गजू घोडके यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन बहुतांश नागरिकांनी दिलेले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!