पंकज भुजबळांना विधान परिषदेतून संधी देण्याची शक्यता!

भुजबळांना ‘बॅकडोअर एन्ट्री’ देण्याचा सरकारचा प्रयत्न?

लाल दिवा-मुंबई ,दि.१५:-(प्रतिनिधी): ज्येष्ठ नेते पंकज भुजबळ यांना लवकरच विधान परिषदेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात राज्य सरकारने हालचाल सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात ७ जणांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ यांचे नाव असल्याचे समजते. 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर भुजबळ हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे पुन्हा एकदा राजकीय रिंगणात उतरले आहेत. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची वर्णी लागल्यास ते पुन्हा एकदा विधिमंडळात दाखल होऊ शकतील आणि त्यांना मंत्रिपदही मिळू शकते.

यापूर्वी भुजबळ हे अनेक वर्षे राज्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांच्याकडे जलसंपदा, गृह, समाजकल्याण अशा विविध खात्यांची जबाबदारी होती. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कौशल्य पाहता त्यांना पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!