हॉस्पिटलमध्ये घुसून दहशत, डॉक्टरांना मारहाण; पंचवटीत गुन्हा दाखल

  • निरामय हॉस्पिटलमध्ये ‘जितू’ची दहशत! डॉक्टरांना मारहाण, रुग्ण हादरले

लाल दिवा-पंचवटी, नाशिक: निरामय हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री एका तरुणाने घुसून दहशत माजवली. या तरुणाने हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा करत कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली. तसेच, हॉस्पिटलची तोडफोड करण्याची धमकी देत सुरक्षारक्षकाला मारहाण केली. ही घटना घडली ती दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास निरामय हॉस्पिटल, आनंद संकुल, पहिला मजला, दिंडोरी रोड येथे.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९६/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३३३, १२६(२), २९६, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जास्मीन उर्फ जितु पटेल (हॉटेल पंचवड प्राईडचे मालक अमित पटेल यांचा लहान भाऊ) असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे घुसला आणि त्याने तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हॉस्पिटलची तोडफोड करण्याची आणि हॉस्पिटल बंद करण्याची धमकीही दिली. यावेळी हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. रामदास पवार आणि डॉ. प्रधुन्न यादव हे रुग्णांवर उपचार करत होते. आरोपीने हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षक विजय पवार यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. 

हॉस्पिटलचे मालक डॉ. अमित दिगंबर धांडे (वय ४३ वर्षे) यांनी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोउपनि / कैलास जाधव हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोउपनि/प्रदीप गायकवाड आणि पोउपनि/कैलास जाधव हे रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. 

ही घटना रात्री उशिरा घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलसारख्या ठिकाणीही सुरक्षितता नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!