पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 22 सप्टेंबर रोजी आयोजन…!

लाल दिवा -नाशिक, दिनांक 15 सप्टेंबर, 2023 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक आणि एम.इ.टी भुजबळ नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 22 सप्टेबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता भुजबळ नॉलेज सिटी महाविद्यालय परिसर, आडगाव, नाशिक येथे करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक अनिसा तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/46cytRB या लिंकवर नोंदणी करावी. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. 

भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेयर’ या ऑप्शन वर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी. 22 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांनी मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती तडवी यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!