पंचवटी पोलिसांची मोठी कामगिरी ! दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या ४ आरोपींना अटक, घातक शस्त्रे जप्त…पंचवटी गुन्हेशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी…!

लाल दिवा-नाशिक,ता.१४: मा. श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील मालाविरूध्द गुन्हयांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या.

 

त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळे यांनी गुन्हे शोध पथकातील सपोनि रोहित केदार व पथक यांना मालाविरूध्द गुन्हयांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत प्रभावी गस्त व उपाययोजना करण्याबाबत सुचित केले होते. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग वाहन, पंचवटी पिटर मोबाईल, पंचवटी काईम मोबाईल असे मालाविरूध्द गुन्हे तसेच इतर गुन्हे घडू नये म्हणुन सतत गस्त सुरू असते.

 

दिनांक १४/१२/२०२३ रोजी रात्री १२.४५ वा. चे सुमारास पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक पेट्रोलींग करित असताना गणेशवाडी मरी माता मंदीराचे मागे गोदावरी हॉटेल येथे झाडाच्या आडोशाचा फायदा घेवुन पाच ते सात इसम संशयितरित्या काहीतरी करण्याच्या इरादयाने दिसले असता गुन्हे शोध पथकाचे पेट्रोलिंग वाहन त्यांचे कडे विचारपुस करण्यासाठी गेले असता ते तेथुन पळुन जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यातील चार इसमाना अमरधाम रोड शाही मार्ग येथे ताब्यात घेण्यात आले. तसेच उर्वरित एक इसम अंधाराचा फायदा घेवुन तेथुन पळुन गेला आहे. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) अजय शंकर गांगुर्डे रा. शेरी मळा २) जयेश राजेंद जगताप रा. हिरावाडी ३) तुषार रामदास लहरे रा. कोमटी गल्ली, पंचवटी नाशिक ४) अमित श्रवण दुब रा. नागचौक, पंचवटी नाशिक असे सांगुण त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात दरोडयाचे पुर्व तयारीस लागणारे हत्यारे व साहित्ये साधने मिळुन आली. त्यांना त्यांचे ताब्यात हत्यारे व साहित्ये साधनांबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने आणि ते दरोडा करण्याच्या उददेशाने एकत्र जमले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द पंचवटी पोलीस स्टेशन गुरजि नं. ५८७/२०२३ भादवि ३९९,४०२ अन्वये भारतीय हत्यार कायदा ४,२५ मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्याचा पुढील तपास मसपोनि / गावित या करित आहेत.

 

सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वरिष्ठ पो . निरीक्षक श्री. अनिल शिंदे, पो. निरीक्षक श्री. सपकाळे (गुन्हे), पो. निरीक्षक श्री. बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक प्रमुख सपोनि रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड, पो.हवालदार नांदुर्डीकर, पो.नाईक लोणारे, पो. नाईक शिंदे, पो.शिपाई पवार, पो.शिपाई साबळे, पो.शिपाई पंचलोरे, पो.शिपाई लभडे अशांनी संयुक्तिक रित्या केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!