अवैध अग्निशस्त्र बाळगणारा पाहीजे आरोपीतास खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात !
लाल दिवा, ता. २६ : आरोपी मयुर रामदास गांगुर्डे, वय २८ वर्षे, याच्या विरोधात यापुर्वी अंबड पोलीस स्टेशन गु.र.क्र. २२५/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी योगेश रघुनाथ मराठे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता.
नमुद गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी योगेश रघुनाथ मराठे हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, | पाथर्डी फाटा, नाशिक येथे येणार असल्याची पो. अं. २५०९ निकम व पो. अं. २३९२ जुंद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन पाहीजे आरोपी योगेश रघुनाथ मराठे, वय २८ वर्षे, रा. आनंद वाटीका समोर, कारगिल चौक, | दत्तनगर, चुंचाळे, अंबड, नाशिक यास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाथर्डी फाटा, नाशिक येथुन ताब्यात घेवुन पुढिल कारवाई करीता अंबड पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, सो. गुन्हे व श्री. वंसत मोरे, सहा. पोलीस आयुक्त, साो. गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रविण सुर्यवंशी, खंडणी विरोधी पथक, नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार सपोउनि. दिलीप सगळे, पोहवा. किशोर रोकडे, पोना. दत्तात्रेय चकोर, योगेश चव्हाण, पोअं स्वप्नील जुंद्रे, विठठल चव्हाण, भगवान जाधव, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम व सविता कदम यांनी केलेली आहे.