एन.डी.पी.एस. कायदयाअंतर्गत करावयाची कारवाई व तपास पध्दती संदर्भात पोलीस कार्यशाळेचे आयोजन…!
लाल दिवा-नाशिक,ता.१४ : मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतुन तरुणांमध्ये वाढत असलेल्या अंमलीपदार्थाची व्यसनाधिता व त्यातुन निर्माण होणारी गुन्हेगारी मोडीत काढुन अंमली पदार्थाच्या व्यापाराचे समुळ उच्चाटन करण्याकरीता एन.डी.पी.एस. कायदयाअंतर्गत करावयाची कार्यवाही व तपास पध्दती याबाबत पोलीस अधिकारी व अमलदार यांना आवश्यक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार आयुक्तालयातील पोलीस ठाणे येथील ए.टी.सी.सेलमध्ये कार्यरत अधिकारी, अंमलदार तसेच गुन्हेशोध पथकात कार्यरत अधिकारी, अंमलदार सोबतच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अंमलदार गुन्हेशाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता दिनांक 14/12/2023 रोजी सकाळी 09.30 ते 17.00 वाजेपावेतो भिष्मराज सभागृह, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे एन.डी.पी.एस. कायदा 1985 अंतर्गत करावयाची कारवाई व तपास पध्दती या विषयावर दोन सत्रात तज्ञ व्याख्याते यांचे उपस्थितीत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
आयोजीत केलेल्या कार्यशाळेकरीता एन.डी.पी.एस. कायदयाच्या कार्यवाहीमध्ये तज्ञ व्याख्याते श्री. देवराम वडमारे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, मुंबई शहर, श्री. बबन सानप, सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक, मुंबई शहर हे उपस्थित होते. उपस्थित व्याख्याते यांचे मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, नाशिक शहर यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.
उपस्थित व्याख्याते यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना एन.डी.पी.एस. कायदा 1985 अंतर्गत विविध कलमान्वये करावयाची कारवाई व त्याबाबत करावयाचा सखेल तपास तसेच अत्यावश्यक असलेल्या नियमांची पुर्तता याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेत उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थीत केलेले प्रश्न व त्यावर सकारात्मक पध्दतीने त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. उपस्थित दोन्हीही तज्ञांनी कार्यशाळेकरीता हजर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्टपणे मार्गदर्शन केल्याने भविष्यात अंमलीपदार्थ अनुषंगाने कारवाई करतांना व दाखल गुन्हयांचा तपास करतांना मदत होणार असल्याचे अधिकारी व अमलदार यांनी मनोगत व्यक्त केले
सदर कार्यशाळेकरीता पोलीस ठाणे अंतर्गत ए.टी.एस. सेलचे कामकरणारे अधिकारी व लेखनिक तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक व गुन्हेशाखेकडील युनिट-1 व युनिट-2 व पीसीबी-एमओबी शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण 20 पोलीस अधिकारी व 60 पोलीस अंमलदार कार्यशाळेकरीता उपस्थीत होते.