बोगस शिक्षक भरती प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश….!

लाल दिवा-नाशिक,ता.१४ :- देवळाली कॅम्प येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित देवळाली हायस्कूलचे तत्का. शिक्षक आणि सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक निशांत गटकळ हे जेलरोड स्थित विनाअनुदानित शाळेत नियमित सेवेत असतांना त्यांनी बऱ्हाणपूरचे येथील एका संस्थेकडून डिप्लोमा इन एज्युकेशन हे दोन वर्षाचे शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त केले तसेच गटकळ यांनी सादर केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार देवळाली हायस्कूलच्या संचमान्यतेत पद रिक्त नसतांना संस्थेने केलेली नेमणूक अवैध असल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकारी यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता शिक्षण उपसंचालकांनी रद्द केली आहे. तसेच शासनाची फसवणूक प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आले आहे.

 

 

बेकायदेशीर मान्यता रद्द करण्यात आली असली तरी दोषींवर नियमानुसार कारवाई आणि शासनाची फसवणूक झाल्याने गुन्हा दाखल करण्याचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी काढले असून शिक्षण विभागाची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

 

निलेश सिताराम साळुंखे – अध्यक्ष नाशिक पॅरेंटस असोसिएशन तथा शिवसेना उपविभागप्रमुख – आर्थिक संगनमताने सदोष भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्था विरोधात कारवाई करण्यात यावी. गटकळ यांची मान्यता रद्द होवून २ महिने उलटले मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही व वसुलीची कारवाई नाही या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!