सेवानिवृत्ती प्रसंगी पोलिसांच्या डोळ्यात पाणी…… पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न….!
लाल दिवा : .श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात येतो. दिनांक ३१/०१/२०२४ रोजी पोलीस आयुक्तालय आस्थापनेवर कार्यरत असलेले १) पोलीस निरीक्षक श्री अशोक साखरे नेम. नियंत्रण कक्ष २) पोउनि. रमेश देशमाने, नेम. शहर वाहतुक शाखा ३) श्रेणी पोउनि. सुर्यकांत गोवर्धन नेम. विशेष शाखा ४) सपोउनि. मनिरोद्दीन शेख नेम. दंगल नियंत्रण कक्ष ५) सपोउनि. कांतीलाल सरोदे नेम. पोलीस मुख्यालय ६) सपोउनि. बाळु भवार नेम. देवळाली कॅम्प, पोलीस ठाणे ७) सपोउनि. प्रकाश पाटील नेम. अभियोग कक्ष ८) महिला पोहवा /१६१३ भारती गायकवाड नेम. पोलीस मुख्यालय ९) महिला पोहवा/१८०४ विजया खैरनार नेम. भद्रकाली पो.स्टे. असे एकुण ०९ पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस खात्यामध्ये उत्कृष्टपणे सेवा बजावुन नियत वयोमानाने यशस्वीरित्या पोलीस दलातुन सेवानिवृत्त झाले आहे.
पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वयाचे ५८ वर्षापर्यंत पोलीस दलात बजावलेली सेवा व पोलीस सेवेतील सेवानिवृत्ती आठवणीत राहावी या निमीत्त भिष्मराज हॉल, पोलीस मुख्यालय येथे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. निरोप समारंभाच्या कार्यक्रमावेळी पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पोलीस खात्यात भरती झालेपासुन ते सेवानिवृत्ती पर्यंत कामकाज करत असतांना आलेले अनुभवाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक तसेच पोलीस दलातील सहकारी यांनी सुध्दा सोबत कामकाज करतांनाचे अनुभव कथन करून पोलीस खात्याबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निरोप समारंभ कार्यक्रमावेळी मा. श्री. चंद्रकात खांडवी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) नाशिक शहर यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुंटुबीय यांचा सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोउनि. धनराज पाटील यांनी करून मा.श्री. अंबादास भुसारे,सहा. पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रम मा. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनात मा. श्री. चंद्रकात खांडवी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मा.श्री. अंबादास भुसारे, सहा. पोलीस आयुक्त ( प्रशासन), प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुंटुबीय तसेच पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत पार पडला.