पहिल्याच दिवशी शाळेत नव्हे तर गेटवर बसावे लागले विद्यार्थ्यांना …!
लाल दिवा : शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी रस्त्यावर बसले होते. गेल्या दोन महिन्यापासून पालक व मॅनेजमेंट मध्ये इमारतीबाबत वाद सुरू होता. याबाबत मंगळवारी पालकांनी आंदोलन केल्याने व्यवस्थापनाने पालकांच्या आठ जणांच्या समितीला चर्चेसाठी बोलावले होते.
मात्र व्यवस्था
पनाने एकतर्फी निर्णय दिल्याने पालकांच्या प्रतिनिधींना सदरहु निर्णय मान्य न झाल्याने मिटींगला काही तथ्य राहिले नव्हते. अशातच व्यवस्थापनाने मुलांची शाळा १५ जून पासून न उघडता तीन जुलै पासून उघडून खराब इमारतीला दुरुस्त करून देण्याचे पत्र पालकांना पाठवले होते. मात्र पालकांना सदरहू निर्णय मान्य नसल्याने आज राज्यातील सर्व ठिकाणी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. मात्र भोसला शाळेचे सी एचएम इ एस शिशुविहार व बालक मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवर बसण्याची नाचक्की पत्करावी लागल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण पुन्हा एकदा दिसून आले.