लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चोरणाऱ्या पोलिसाला …..गुन्हे शाखा युनिट २ च्या टीमने केले जेरबंद…. नागरिकांनी केले त्यांचे तोंडभर कौतुक….!
लाल दिवा-नाशिक,२० : कायद्याचे रक्षकच भक्षक असल्याची धक्कादायक घटना शहरातून उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्तालयात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस शिपायाने चक्क अल्पवयीन मित्राच्या मदतीने पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकाली. ही घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्यावर घडली. विशेष म्हणजे, चोरीनंतर वाद झाल्याने मित्रानेच पोलिसांना सोनेचोरीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चोरट्या पोलिसाला अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शंकर लोंढे असे संशयित पोलीस शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने एक महिला पायी जात होती. त्यावेळी संशयित आरोपी व पोलीस योगेश लॉढे हा १७ वर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन जात होता. त्याने पादचारी महिलेच्या गळ्यातील
- मंगळसूत्र हिसकावले. त्यावेळी महिलेने आरडाओरड केला. मात्र, दोघे पळून
गेले. काही अंतरावर लोंढे व अल्पवयीन मित्रात मद्यधुंद अवस्थेत असताना वाद झाले. वाद वाढत गेल्याने अल्पवयीन मुलाने थेट पोलिसांनाच घटनेची माहिती दिली. त्यानंतर नाशिक शहर युनिट दोनला संशयित आरोपीची माहिती समजली. पथकाने संशयित लोंढे यास काही वेळात ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो पोलीस शिपाई असल्याचे समोर आले. याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनने संशयित पोलीस लोंढे यास अटक केली
आहे