बंद! बंद!! बंद!!!
सर्व देशाचे नागरिक नाशिक वासिय यांना नम्र आवाहन, बांग्लादेश मधील अल्पसंख्यांक हिंदू माता भगिनी व बांधवांवर अनाहूत अत्याचार, जाळपोळ, शारिरिक छळ करीत अमानुष हत्या केल्या जात आहेत. हे प्रसारित झालेले व्हिडिओ हृदय पिळवटून टाकनारे कृत्य आहे.
या सबंध घटने विरोधात भारत सरकार च्या माध्यमातून बांग्लादेशी हिंदुना संरक्षित केले जावे व त्या नराधमाना शासन व्हावे यासाठी शांततेच्या मार्गाने सकल हिंदू समाज नाशिक च्या वतीने नाशिक जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे.
तरी या बंद समयी सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या बंद मध्ये सहभागी व्हावे. हिंदुवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठि एकजुटिने सहभागी व्हावे.
समस्त सकल हिंदु समाज समिति च्या वतीने पुनश्च आवाहन कि, उद्या १६ रोजी दुपारी 3 वाजता शालिमार चौकात संघटित होऊन तेथून पायी रैलीला प्रारंभ होणार व नियोजना नुसार समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे होईल. याकरिता हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
विशेष नोंदी…
- १) नियोजित बंद सकाळी 7 वाजल्यापासुन सुरु होईल.
- २) सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने बंद बाबत सर्व व्यवसायिक, संस्था, दुकाने, कार्यालये, शहर वाहतूक बस सिटी लिंक आदि. मा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जात नाही तोवर स्वंयस्फुर्तिने बंद ठेवतील असे आवाहन करण्यात आले व बंद च्या दिवशी देखील करण्यात येईल.
- ३) कुणीही सकल हिंदु समाज प्रतिनिधि अथवा हिंदु बांधव यांनी अनुचित प्रकार घड़नार नाही यांची दक्षता घ्यायची आहे. संपूर्ण बंद कालावधीत शांतता प्रस्थापित राखली जावी ही सर्वांची जबाबदारी असेल.
- ४) नाशिक बंद दरम्यान शालेय वाहतूक (रिक्षा, वैन, स्कूल बस) व्यवस्थेस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपन सर्वानी घ्यायची आहे.
- ५) नाशिक बंद दरम्यान राज्य परिवहन प्रवासी वाहतूक एस टी बस देखील सुरळीत सुरु राहतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
- ६) नाशिक बंद दरम्यान सकल हिंदू समाज च्या सर्व हिंदू बांधवानी आपल्या जबाबदारी आटोपुन ठीक २.३० वा शालिमार चौक देवी मंदिर येथे सर्वांनी आपल्या सह सर्व हिंदू बांधवाना संघटित करावे.
- ७) शालिमार चौक येथून ठीक 3 वा पायी रैली नियोजना नुसार जिल्हाधिकारी कार्यलया कड़े जान्यासाठी मार्गस्थ होईल.
- ८) नाशिक बंद दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करायचे आहे.
- ९) नाशिक बंद दरम्यान कुठेही बसेस अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कुणी करीत असल्यास तत्काळ पोलिस यंत्रणेच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे.
- १०) नाशिक बंद दरम्यान मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास प्रमुख ५ हिंदू बांधव जातील यांची नोंद घ्यावी.
– सकल हिंदु समाज, नाशिक