निखिल आडे यांचा भाजपाला रामराम! “झेरॉक्स नगरसेवकांमुळे पक्ष सोडतोय”, बडगुजर यांच्यावर विश्वास ठेवत राजीनामा…!
लाल दिवा-नाशिक: भाजपा युवा मोर्चाचे नवीन नाशिक उपाध्यक्ष निखिल आडे यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पदाचा राजीनामा दिला आहे. “काही गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत”, असे म्हणत त्यांनी पक्षावरील नाराजी व्यक्त केली. विशेषतः काही नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र टीका केली आहे. “झेरॉक्स नगरसेवक पक्षनिष्ठा विसरले आहेत. ते स्वतःला मोठे समजून पदाधिकाऱ्यांना त्रास देतात. पण हे ‘फुगलेले बेडूक’ लवकरच फुटतील,” असा घणाघात आडे यांनी केला.
आडे यांनी भावी आमदार सुधाकर बडगुजर यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. निवडणुकीत बडगुजर यांना पाठिंबा देण्यासाठीच भाजपा सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही जनतेच्या हक्काचा माणूस निवडून आणला असे वाटले होते, पण उलट आम्हालाच त्रास सहन करावा लागतोय,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
आपल्या राजीनाम्यामुळे पक्षाला फरक पडणार नसला, तरी पक्ष सोडण्यामागचे कारण नेतृत्वाने जरूर समजून घ्यावे, असे आवाहन निखिल आडे यांनी केले आहे.