राष्ट्रीय युवा महोत्सव होणाऱ्या तपोवन मैदानाची पाहणी…!
लाल दिवा-नाशिक,ता.५:-नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या जागेची पाहणी केली. यावेळी मंत्री संजय बनसोडे हे देखील उपस्थित होते. राष्ट्र युवा महोत्सव नाशिक येथे होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. 12 ते 16 जानेवारी दरम्यान २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमान पद आपल्याला मिळाले आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
नाशिकची निवड झाल्याने ही महाराष्ट्राला मोठी संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव दैदिप्यमान करण्याची मोठी संधी नाशिककरांना आहे. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे, यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे.
आज मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून कुठलीही कमी भासायला नको यासाठी सर्वोतोपरी काम करण्याच्या सूचना यावेळी यंत्रणेला दिल्यात. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आदी पदाधिकारी उपस्थित होते.