“कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य, आदिवासी कोळी व कोळी हृदय सम्राट,आमदार रमेश पाटील यांचा एक खडतर तरीही यशस्वी प्रवास”

लाल दिवा -नाशिक,दि.१४ : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

       माणूस कोठे पोहोचला, यापेक्षा तो कुठून कुठे पोहोचला यावरून त्याला यशस्वी ठरवले जाते, हे कोणी एका विचारवंतांनी म्हटले होते. राजाचा पुत्र जन्मतःच राजपुत्र बनतो आणि नंतर तो राजा होतो. एखादा दिल्लीत एका तासात पोहोचतो, कारण तो जवळच आग्राला राहतो. “परंतु अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जन्म घेणारा जेव्हा कोळी जमातीच्या विकासासाठी वाट चालू लागतो तेव्हा तो दिल्लीत पोहोचतो, यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जाते!”

        वरिल म्हणण्याचा तोच अर्थ आहे की, रमेश पाटील यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. खेडेगावात,तालुक्याची ठिकाणी शिक्षण झाले. सध्या उद्योगपती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून घेतली.

          चांगली नोकरी व उद्योग करून स्वतःचा चांगला संसार थाटला असता परंतु तो सोडून समाज कार्यासाठी-सुलभभावनेचा त्याग करून समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार आमदार रमेश पाटील करीत आहेत. 

        समाजासमोर तशी शपथ घेतली व समाजाचा विकास करण्यासाठी विडा उचलला आणि एक खडतर प्रवासाचा आरंभ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू केला आणि आज ही ती वाट आमदार रमेश पाटील आणि कुटुंबातील सदस्य त्याच उत्साहाने चालू ठेवत आहेत. 

         मुंबईत आंदोलनाचा तो दिवस आज ही मला आठवत आहे. जसा काही काल घडल्यासारखा वाटतो. आझाद मैदान येथे कोळी महासंघातर्फे आयोजित केलेला ऐतिहासिक देता की जाता आंदोलन राजसत्ता बदलणारे ठरले. त्याचे साक्षीदार तुम्ही-आम्ही, राज्यातील मंत्रीमहोदय, आमदार आणि खासदार आहेतच. समाजाचा नेता असावा तर रमेश पाटील सारखाच

         मंत्रालयात कधीच स्वतःच्या कामासाठी मा.श्री. रमेशदादा पाटील आणि अँड.चेतनसर आले नाहीत. तर ते सतत समाजाचा प्रश्न घेऊन येत असतात. मी ते इतर कोणत्याही समाजाचे नेतृत्व पाहीलेले नाही. अनेक मंत्रीमहोदयासोबत मी असतो, त्यावेळी दादाबद्दल अनेक वेळा मंत्री महोदयाकडून ऐकले हे स्वतःसाठी काहीच मागत नाही. जे काही मागायचे ते फक्त माझ्या समाजासाठी-जमातीसाठी… खरंच तळमळीचा नेता असावा तर फक्त रमेशदादा पाटील सारखाच… 

        मला नेहमीच दादांचे एक वाक्य आठवते की, सैंदाणेसाहेब आपण कोळी जमातीत जन्माला आलोय, समाजाचे आपण देणे लागतोय, मला परमेश्वराने काही कमी केले नाही. आता जे काही करायचे ते आपल्या जमातीसाठी-समाजाच्या उन्नतीसाठी…

         रमेश पाटील यांचा प्रवास त्यांच्या चळवळी, विचार, स्वभाव आणि कार्यशैलीबद्दल खूप काही बोलण्यासारखे (लिहण्यासारखे) माझ्याकडे आहे. रमेश पाटील म्हणजे एक महासागर आहे, त्यातून एक घागर समोर काढून ठेवली तरी संपूर्ण रमेशद पाटील समजू शकतात? 

       रमेश पाटील आता फक्त आमदार झालेत. खासदार- मंत्री झाले नाहीत. तरीही जमातीची (समाजाची) अनेक प्रश्न शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देणारे जमातीतील (समाजातील) एकमेव नेतृत्व ठरले. जमातीसाठीच त्यांनी जीवन सर्वस्वाचा त्याग केला. त्या रमे पाटील यांच्या मागे सच्चा मावळा असल्याचा मला अभिमान वाटतो! 

       शिकला, नोकरी केली, बंगला बांधला, पैसा कमवला, चांगला संसार केला यात वैयक्तिक यश नक्कीच आहे. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, मोठे अधिकारी बनतात यातही वैयक्तिक यश नक्कीच आहे. एन जी ओ काढली, शाळा बांधली, संस्था उभारल्या यातही वैयक्तिक यश नक्कीच आहे. प्रस्थापित राजकीय पक्षातून आमदार-खासदार-मंत्री बनतात त्यातही वैयक्तिक यश नक्कीच आहे. परंतु राज्यात सर्वात मोठी तिजोरी मुंबई, आणि सर्वात मोठी पावर ज्याठिकाणी आहे अशा संसदभवन दिल्लीत लक्ष केंद्रित करून कोळी महासंघ निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर विवीध राज्यात मा. श्री. रमेशदादा पाटील यांना मानणारा मोठा-छोटा गट तयार झाला. मा. श्री. रमेशदादा पाटील यांची जमातीला (समाजाला) प्रजा ते राजा पर्यंत बनवण्यासाठी वाटचाल सुरू आहे. कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवायचा थांबत नाही आणि तो थांबणार ही नाही. 

      मा. श्री. रमेशदादा पाटील आज जमातीत (समाजात) नंबर एक वर आहेत. नेतृत्वाच्या तुलनेत मा. श्री. रमेशदादा पाटील यांच्या आसपास महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही कोणी नेता मला दिसला नाही. प्रस्थापित संघटनेचे काही नेते आपले आणि आपल्या जमातीचे स्थान शोधत असताना मा.श्री.रमेशदादा पाटील यांनी आपली *कोळी महासंघ स्थापन करून केवळ कोळीच नव्हे तर तमाम उपेक्षित, दुर्लक्षित, दलित मागास प्रवर्गासाठी आदर्श निर्माण केला. “कोळी जमातीला (समाजाला) राष्ट्रीय समाजाचा प्रमुख राजकीय सत्ता” नसतांना अशक्य वाटावे असे ध्येय त्यांनी उराशी बाळगणे आहे. न थकता, न थांबता मोठ्या चिकाटीने त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न मा. श्री. रमेशदादा पाटील करीत आहेत. का, कसे, कोणी, असे-तसे प्रश्न विचारला असता त्यांच्या त्या वाटचालीत थोडासा वाटा उचलू शकलो तर मा. श्री. रमेशदादा पाटील यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे!

        आधुनिक युगातील महाभारताचे चक्रव्यूह भेदू पाहणा-या या नवीन अभिमन्यूला साथ देऊ या! एवढीच कळकळीची नम्र विनंती आहे. राजपुत्र ते राजा असा मा. श्री. रमेशदादा पाटील यांचा प्रवास नसून तो सामान्य कुटुंब ते समाजभूषण असा आहे. त्यामुळे त्यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, रमेशदादा पाटील यांच्या सारखे फक्त आणि फक्त तेच आहेत.त्यांच्यासारखे कोणीही नाही? 

        आमदार पाटील आपल्या इप्सित ध्येया पर्यंत लवकरात लवकर पोहोचो ह्याच त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख-लाख हार्दिक शुभेच्छा!!! आणि आपल्या कर्तृत्वाला सलाम!!!

 

  शब्द संकलन : श्री युवराज चिंतामण सैंदाणे. 

 संस्थापक = आदि. कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक. 

संपर्क प्रमुख = कोळी महासंघ नाशिक. 

उपाध्यक्ष = भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा नाशिक

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!