जमीन माफियांचा डाव उघड! 10 लाखांचा गेम, पण खेळला कोणाशी? नाशिककराला लुटणाऱ्यांना पोलीस ठाण्याचा रस्ता!
स्वप्नांचे घर भुरळ पडली महागात, निवृत्तीची कमाई लुटली
लाल दिवा-नाशिक,दि.५ :- स्वप्नांचा बंगला उभारण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका निवृत्त कर्मचाऱ्याला ‘जमीन जिताऊ’ टोळीने आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी ‘बंटी-बबली’च्या जोडीसारखी बनावट कागदपत्रे आणि गोड बोलून लोकांना फसवत होती.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, निवृत्त कर्मचारी दिलीप राठोड (नाव बदलले आहे) हे निवृत्तीनंतर नाशिकमध्ये घर घेण्याच्या शोधात होते. त्याच सुमारास त्यांची भेट शोभा आणि रमेश साळवे (.1) शोभा रमेश साळवे 2) रमेश रावजी साळवे दोघे रा. मु.पो. शिंदे ता.जि. नाशिक
यांच्याशी झाली.
ही जोडी राठोडांना “जमीन जिताऊ” स्कीमचे आमिष दाखवत होती. मौजे शिंदे येथील एक प्लॉट दाखवत त्यांनी तो स्वतःचा असल्याचे भासवले आणि राठोडांना तो विकण्याची तयारी दर्शवली. कमी किमतीत मिळणाऱ्या या प्लॉटच्या बहाणा सांगत, त्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून राठोडांना विश्वासात घेतले आणि त्यांच्याकडून १० लाखांहून अधिक रक्कम उकळली.
पैसे घेतल्यानंतर मात्र, ‘बंटी-बबली’ने राठोडांना टाळाटाळ सुरू केली. जेव्हा राठोडांना संशय आला आणि त्यांनी अधिक तपास केला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांना ज्या प्लॉटचे आमिष दाखवण्यात आले होते तो तर आधीच दुसऱ्याच्या मालकीचा होता!
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राठोडांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस सध्या ‘बंटी-बबली’च्या शोधात असून नागरिकांना अशा फसव्या जमीन व्यवहारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे..