नाशिक पश्चिम : ‘ब्रदर्स वॉर’सह चौरंगी लढतीकडे वाटचाल!

नाशिक पश्चिम : बडगुजर, हिरे, पाटील बंधू – चौरंगी लढतीत कोण जिंकणार जनतेची मने?

लाल दिवा-नाशिक,दि.२४:-नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत येथे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, ज्यात ‘ब्रदर्स वॉर’ हे देखील एक वेगळेच आकर्षण ठरणार आहे.

माजी महापौर दशरथ पाटील यांनी नुकताच स्वराज्य पक्षात प्रवेश करत नाशिक पश्चिममधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. आता त्यांचे बंधू दिनकर पाटील यांनी देखील मनसेत प्रवेश करत त्याच मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

दुसरीकडे, उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर हे या मतदारसंघातून दीर्घकाळापासून काम करत असून त्यांचा जनतेशी थेट संपर्क आहे. त्यातच भाजपाने देखील सीमा हिरे या अनुभवी नेत्यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढाई अधिकच रंजक वळणावर आली आहे. 

दशरथ पाटील यांचा विकासकामांचा अनुभव आणि जनतेशी असलेले नाते हे त्यांचे बळ ठरणार आहे, तर दुसरीकडे दिनकर पाटील यांना मनसेच्या आक्रमक राजकारणाचा फायदा मिळू शकतो. सुधाकर बडगुजर यांचा अनुभव आणि त्यांचे स्थानिक कार्य हे त्यांचे बळ असणार आहे तर भाजपाची सत्ता आणि संघटनात्मक ताकद ही सीमा हिरे यांना बळ देणारी ठरेल.

एकूणच, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ‘ब्रदर्स वॉर’सह चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यात कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!