नाशिक पोलीसांचा विजय! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षांचा कारावास

पीडितेचा आवाज, न्यायालयाने ऐकला

लाल दिवा-नाशिक, १८ नोव्हेंबर २०२४ – नाशिक पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांचा कारावास व १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे समाजातील गुन्हेगारांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पीडितेला न्याय मिळाल्याने एक दिलासा मिळाला आहे.

दिनांक २७ मे २०२१ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॅपी गेस्ट हाउस येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फसवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. रुझान समिर पठाण याने मैत्रीचे नाते जोडून रविंद्र देवरे आणि रोशन कोमरे यांच्या मदतीने मुलीला गेस्ट हाउस मध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१५/२०२१ अन्वये भादंवि कलम ३७६(३), १०९ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक लियाकत पठाण यांनी अतिशय चोख तपास करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आरोपींना शिक्षा होऊ शकली.

मा. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ९ चे न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मलकापट्टे रेड्डी यांनी आरोपींना दोषी ठरवून २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल.

या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता श्रीमती सुलभा सांगळे, कोर्ट पैरवी अधिकारी मपोकॉ. धनश्री हासे आणि कोर्ट अंमलदार सपोउपनि दिनकर खैरनार यांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावली.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मोनिका राऊत, सपोआ संदीप मिटके, सपोआ सचिन बारी आणि वपोनि अशोक गिरी यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

या घटनेमुळे नाशिक पोलीस दलाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. पोलीस दलाच्या या धाडसी कारवाईमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे. पीडितेला न्याय मिळाल्याने समाजात न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ झाला आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!