नाशिक पोलीसांची धडाकेबाज कारवाई: अवैध कट्टा, काडतूससह एक इसम जेरबंद

नाशिक शहर सुरक्षिततेच्या दिशेने आणखी एक पाऊल

लाल दिवा-नाशिक,दि‌८:- नाशिक शहर पोलीसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गुंडा विरोधी पथकाने गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतून एका इसमाला देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुससह अटक केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ३१,००० रुपये असल्याचा अंदाज आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक सातत्याने कारवाई करत आहे. ७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अशोक अघाव यांना गुप्त माहिती मिळाली की, कवडे गार्डन, बालाजी मंदिर रोड येथे एक इसम देशी बनावटीचा पिस्तूल घेऊन येणार आहे.

या माहितीवरून गुंडा विरोधी पथकाने सापळा रचला. सनी संजय कटरे (वय २४, रा. गंगापुरगाव) या इसमाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडला. कटरेकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि पोलीस आयुक्तांच्या विनापरवाना शस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला गंगापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोउनि गुंजाळ, सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनिल आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक अघाव, राजेश राठोड आणि सुनिता कवडे यांनी संयुक्तपणे पार पाडली. पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!