नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांचे का बरं केले असेल कौतुक…..!
लाल दिवा : पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत कारवाई करत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे कौतुक होत आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुद्धा द्विट करत कौतुक केले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार (भा. पो. से.) @CPPuneCity आणि त्यांच्या टीमचे या अभिमानास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन – अंदाजे ११०० कोटी रु. किंमतीचे ६०० किलो अंमली पदार्थ जप्त.
मा. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंमली पदार्थांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'…
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) February 20, 2024
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (ता. १९) वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. तेथूनच पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी आपली सर्व सुत्रे हलवत पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या. पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज जप्त केला. त्यानंतर दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकम कारखान्यावर छापा मारली. जिथे ड्रग्जची निर्मिती होत होते. येथे पोलिसांनी 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. त्याशिवाय या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी असल्याचेही तपासात समोर आले.
- मिठाच्या पाकिटात लपवला ड्रग्ससाठा…
वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्स विक्री करायचे. साधा ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग्ससाठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता.
- आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर…
19 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.