नाशिक शहर वाहतूक शाखेची जबरदस्त कामगिरी….. ग्रीन कॉरीडॉर निर्धारीत वेळेत पोहचणार असल्याने पाच लोकांचे वाचणार प्राण….!
लाल दिवा-नाशिक,ता.२३ : मा. पोलीस आयुक्त साो. श्री संदीप कर्णिक, यांनी मा. पोलीस उपआयुक्त वाहतूक श्री. चंद्रकांत खांडवी व सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक श्री. डॉ. सचिन बारी वरिष्ठांच्या नियोजनातुन वाहतूक शाखे कडील पायलटींगचे अंमलदार व बंदोबस्तातील अधिकारी व सर्व अंमलदार यांनी सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथुन दोन ग्रीन कॉरीडॉर पैकी एक ग्रीन कॉरीडॉर ओझर विमानतळ येथे अवघ्या आठ मिनीटात निर्धारीत वेळेपेक्षा आगोदर पोहोच केले. सदर ग्रीन कॉरीडॉर ओझर येथुन विमानाने हैद्राबाद येथे नेले जाणार होते. तसेच दुसरे ग्रीन कॉरीडॉर सहयाद्री हॉस्पिटल येथुन बाय रोड पुणे करीता पोलीस बंदोबस्तात अतिशीघ्र केले. ग्रीन कॉरीडॉर निर्धारीत वेळेचे आगोदर पोहोच होणार असुन त्यामुळे पाच लोकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टरांनी शहर वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले व चांगली कामगीरी केले बाबत कौतुक केले आहे.
सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथुन एक ग्रीन कॉरीडॉर हे ओझर विमानतळ येथे पोहोच करण्याकरीता पायलटींगचे अधिकारी पोउपनिरी माणिक देशमुख, चालक पोहवा. संपत कांबळे, व पोअं समाधान गायकवाड यांनी तसेच दुसरे ग्रीन कॉरीडॉर पुणे करीता बायरोड पोहोच करण्याकरीता पोउपनिरी. प्रविण परदेशी, चालक श्रेणीपोउनि. सुर्यवंशी व पोअं. अमोल भवर व बंदोबस्तातील अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले….