नाशिक ! शहर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत सूचना तसेच अभिप्राय जाणुन घेण्यासाठी प्रसारित केला WhatsApp नंबर….!

लाल दिवा-नाशिक,ता.२६ : नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला आहे. नाशिक शहरामधील गुन्हेगारी कमी होऊ लागल्यामुळे नाशिककर पोलिस आयुक्तांचे आभार मानत आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा आढावा घेतला आणि कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहर सुरक्षित कसे करता येईल, याकडे ते लक्ष देत आहेत., पोलिसांनी आता कंबर कसली आहे. एका बाजूला संपुर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून आता अभिप्राय व समस्यांसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे.

 

 

आता नाशिक शहर पोलिसांच्या कामगिरी बाबत आपला अभिप्राय नोंदवावा त्याचप्रमाणे काही सूचना असल्यास त्यादेखील शहरवासीयांनी मांडाव्यात जेणेकरून नागरिक व पोलीस यांच्यातील योग्य सुसंवाद शहर भयमुक्त करण्यासाठी व शहराच्या विकासासाठी कायमच उपयुक्त ठरेल. नागरिकांसाठी विशेष सूचना देखील आहेत सदरचा व्हाटट्सअप क्रमांक हा फक्त आपला अभिप्राय व सूचना लेखी स्वरूपात किंवा काही फोटोज व्हिडिओ टाकण्यासाठीच आहे यावर कुठल्याही प्रकारचे संभाषित कॉल स्वीकारले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी . नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. +919923323311 या नंबर वर कोणीही कधी लिखित स्वरूपात सुचना करू शकतात. पोलीस आयुक्त यांनी सुरू केलाला व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील  सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकतात.

सुरक्षित नाशिकसाठी आपले इनपुट / अभिप्राय /सुचना आम्हाला कळवा… फक्त मेसेजव्दारे – या नंबरवर कॉल करू नका. व्हॉट्सअॅप मेसेज नंबर हा आपत्कालीन प्रतिसाद नंबर नाही.

आपल्या तक्रारी / आपत्कालीन परिस्थीतीसाठी ११२ वरच कॉल करा. ११२ हा आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली नंबर आहे.

 

तुमच्या वैयक्तीक प्रतिक्रीया विचारात घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. असेही आव्हान पोलीस आयुक्त यांनी केले आहे

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!