नाशिक शहर पोलीस आयुक्तालातील पोलीस अधिकारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर….. पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिकाऱ्याकडून अभिनंदनाचा वर्षाव…..
लाल दिवा : पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील अधिकारी यांनी आपले सेवाकालावधीत विविध कामकाजाच्या ठिकाणी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाबदल गुणवत्ता पुर्ण सेवेचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर करण्यात आले आहे.
राष्ट्रपती पोलीस पदक विजेते अधिकारी
- पोउनि. दत्तु रामनाथ खुळे
हे १९९० मध्ये पोलीस दलात भरती झाले असुन पोलीस दलातील खडतर प्रशिक्षण पुर्ण करून पोलीस मुख्यालय येथे त्यांची प्रथम नेमणुक करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकरोड पोलीस स्टेशन, भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, आडगांव पोलीस स्टेशन, आर्थिक गुन्हे शाखा येथे कर्तव्य बजावले आहे व नुकतीच त्यांची पदोन्नतीवर पोलीस उप निरीक्षक या पदावर नाशिक परिक्षेत्रात
पदस्थापना झाली आहे. पोलीस ठाणे येथे कर्तव्यास असतांना त्यांनी मालाविरुध्द व शरिराविरुध्दचे अनेक क्लीष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना वेळोवेळी वरिष्ठांनी बक्षिसे व प्रमाणपत्रे देवुन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
भद्रकाली पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असतांना खुनाचे गुन्हयात तपासी अधिकारी यांचे सहायक म्हणुन
उत्कृष्ट तपास काम केल्याने आरोपीता जम्मठेपेची शिक्षा मा. न्यायालयाने सुनावली आहे. तसेच गुन्हे शाखा नाशिक शहर येथे नेमणुकीस असतांना चोरीचे ७० गुन्हे आणि घरफोडीचे २५ गुन्हे उघडकीस आनण्याचे संबंधाने उत्कृष्ठ कामगिरी करून सुमारे २१ लाख रू. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्यांची नाशिक शहर पोलीस दलात ३३ वर्षे सेवा कालावधीत सुमारे २८६ बक्षिसे ०५ प्रशंसापत्रे मिळाले असुन, सन २०१६ मध्ये मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे सन्मान चिन्हांने सन्मानित करण्यात आले आहे.
- पोउनि गणेश मनाजी भामरे
हे सन १९९१ मध्ये पोलीस दलात भरती झाले असुन पोलीस दलातील
प्रशिक्षण पुर्ण करून त्यांनी पोलीस मुख्यालय, सरकारवाडा पोलीस स्टेशन, भद्रकाली पोलीस स्टेशन, शहर वाहतुक शाखा, पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, अंबड पोलीस स्टेशन, सातपुर पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक येथे कर्तव्य बजाविले बजावले आहे. व त्यांची नुकतीच ठाणे शहर येथे पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती झाली
आहे. त्यांनी पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावतांना १५ एम.पी.डी.ए. प्रस्ताव, तसेच ०६ मोक्का प्रस्ताव सादर करण्याचे संबंधाने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तसेच चैनस्नॅचिंगचे १७ गुन्हे उघडकीस आनले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकात काम करतांना एम.डी. अंमली पदार्थाचा अवैध व्यापार करणा-या गुन्हेगारांचे रॅकेट शोधुन २० करोड रू. किंमतीचे एम.डी. ड्रग्ज व २१ लाख रू. किमतींचा गांजा हस्तगत केला आहे.
पोलीस खात्यात ३३ वर्षे सेवा कालावधीत सुमारे २३९ बक्षिसे १५ प्रशंसापत्रे मिळाले असुन, सन २०१९ मध्ये मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे सन्मान चिन्हांने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर दोनही पोलीस अधिकारी यांना त्यांचे सेवाकालावधीत केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजामुळे गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक नाहिर झाले आहे.
संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नाशिक शहर पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक नाहिर झाल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच दिनांक १५ ऑगष्ट २०२४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे मा. पालकमंत्री, नाशिक यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते यांचा सत्कार करण्यात येणार आहे