मुंबईनाका ! पोलीस स्टेशन कडुन सराईत चोरास अटक, चोरटयाकडुन चार मोटार सायकली जप्त… पोलीस शिपाई गणेश बोरणारे यांची उत्कृष्ठ कामगीरी

लाल दिवा-नाशिक,ता.७ :- नाशिक शहरात व परीसरात दुचाकी वाहन चोरीचे दिवसेंदिवस अनेक प्रकार वाढत चालले असताना नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर प्रकारांना आळा घालणे बाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक, यांनी आदेश दिले होते.

(दि०७) मे २०२४ रोजी मुबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस शिपाई गणेश बोरणारे यांना गोपनीय बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, एक इसम हा भारतनगर, नाशिक याठिकाणी ०२ चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेवुन येणार आहे. त्याअनुषंगाने वरीष्ठांना माहीती देवुन दोन पंचांना सोबत घेवुन भारतनगर, नाशिक येथे मस्जिदच्या बाजुची गल्ली नं. १२, नंदिनी नदीच्या किनारी सुमारे ५ वाजता सापळा रचला असता एक इसम हा एका हौंडा शाईन मोटार सायकल नंबर एम. एच. ३७ ए.एफ ५३०७ या वाहनावर बसलेला दिसला सदर वाहना शेजारी बजाज कंपनीची विकांत मो. सा. क्रमांक एम.एच. १५ एफ वाय ९५८६ ही उभी होती. सदर इसमाने पोलीस पथकास पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी सदर इसमास पाठलाग करून पकडले व त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सोहेल उर्फ बाबु पप्पू अन्सारी, रा. भारतनगर असे सांगितले. सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी वाहने हे चोरी केल्याचे सांगितले. तसेच इतरही दोन दुचाकी वाहने त्याने चोरी केल्याचे कबुल केले. बाबु अन्सारी याकडुन मुंबईनाका पोलीसांनी त्याने चोरी केलेलया एकुण ०४ दुचाकी वाहने हस्तगत केली आहे. 

 

 

अशा एकुण १,०५,०००/- रूपये किमतीच्या एकुण ०४ मोटार सायकली मुंबईनाका पोलीसांनी आरोपी सोहेल उर्फ बाबु पप्पु अन्सारी याच्याकडुन हस्तगत केल्या आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली व मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पो. नि. (गुन्हे) श्री श्रीनिवास देशमुख साो यांचे देखरेखी खाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, सहायक पोलीस उप निरीक्षक रोहीदास सोनार, पोलीस अंमलदार समीर शेख, पोलीस शिपाई गणेश बोरणारे, नवनाथ उगले, सर्व नेमणुक मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांनी केली आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!