मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्यावर १० कोटी च्या अपहराचा आरोप करत आझाद मैदानावर उपोषण …!
लाल दिवा -नाशिक,दि.१९ : नाशिक जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी आपल्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करून स्वतः कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या आप्तेष्टांच्या नावे असलेल्या १० कोटी हुन अधिकच्या बेहिशोबी मालमत्ता केली असून त्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी द्यावी या मागणीसाठी दि. १६/१०/२०२३ पासून आझाद मैदान मुंबई येथे इमान मुसा पटेल यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा मुद्रांक अधिकारी व त्यांचे उपनिबंधक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकताच लँड जिहादचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या कार्यालयाचे व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मालेगाव, नानावली व वडाळा येथे कोट्यावधी रुपयांच्या लँड जिहाद चे काम उपनिबंधकांच्या सहकाऱ्याने झाल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात मालेगाव येथील उपनिबंधकावर चौकशी लावण्यात आली असून लवकरच त्याचे निलंबन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु या सर्व प्रकरणामागे जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे असून त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नुकतेच आझाद मैदानावर एका कार्यकर्त्यांने उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व वरिष्ठ स्तरावर मंत्रिमंडळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- प्रतिक्रीया
- नियमबाह्य कामे करणाऱ्या वर करवाई केलेल्या लोकांकडून अशा लोकांना हाताशी धररून दबावाचा हा स्टंट आहे . यापुढेही कडक करवाई खंबीरपणे चालु राहील. गुन्हेगाराना कोणताही थारा देणार नाही. बेकायदेशीर व नियमबाह्य नोंदणी कामे होणार नाही.
अशा प्रवृत्तींना काही लोक रसद पुरवत असावेत. नोंदणी साठी यांचा कधीच काही संबंध आलेला नाही. यापुढे कायदेशीर सल्ला घेऊन कार्यवाहीचा पर्याय खुला आहे.
- कैलास दवंगे,जिल्हा मुद्रांक अधिकारी, नाशिक
- प्रतिक्रिया
नाशिक जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी आपल्या कार्य काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा महा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती आहे. यासंदर्भात महसूल मंत्री यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. भ्रष्टाचाराचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. त्यामुळेच आझाद मैदानावर त्यांच्या विरोधात उपोषणाला बसलो आहोत. न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
- इमान मुसा पटेल, उपोषणकर्ते, आझाद मैदान, मुंबई