मोटारसायकल चोर जेरबंद: नाशिक पोलिसांची कामगिरी
पोलीस निरीक्षक कड यांच्या प्रयत्नांना यश, मोटारसायकल चोर पकडला
लाल दिवा-नाशिक,६:- नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने दोन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पथक काम करत होते.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएस कोर्ट परिसरात एक मोटारसायकल चोर फिरत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार पोउपनि चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. या कारवाईत किरण विलास जाधव (वय २८, रा. गणेश नगर, देवी मंदिर, पिंपळगाव खांब) याला ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत जाधवने देवळाली कॅम्प आणि इंदिरानगर परिसरातून दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक हिरो होंडा (एमएच ११ एएन ९१०८) आणि एक हिरो होंडा (एमएच १५ बीजी ५१०९) अशा दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नं. ७७/२०२४ (कलम ३७९ भादंवि) आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नं. २१५/२०२४ (कलम ३७९ भादंवि) नोंदवण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईत गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उत्तम पवार, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, प्रदीप म्हसदे, संदिप भांड, रोहिदास लिलके, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, महेश सांळुके, मुक्ता शेख, अप्पा पानवळ, समाधान पवार आदींचा समावेश होता.