सराईत राकेश कोष्टी वर गोळीबार करणाऱ्या १४ जणांविरोधात मोक्काची कारवाई…!
लाल दिवा, ता. १६ : : सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या १४ संशयितांविरोधात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सराईत राकेश कोष्टी याचे संशयितांशी जुने वाद होते, दरम्यान मुख्य संशयित किरण दत्तू अण्णा शेळके (२९,कपालेश्वर मंदिरामागे अंबिका चौक, पंचवटी नाशिक) व त्याचे साथीदार जयेश हिरामण दिवे (३३,रा. पंचवटी नाशिक), विकी ठाकूर (२८, दसकगाव नाशिकरोड), गौरव संजय गांगुर्डे (३२, रा पंचवटी नाशिक), किरण ज्ञानेश्वर क्षीरसागर (२९,रा. पंचवटी,नाशिक), सचिन पोपट लेवे (२३,रा. क्रांतीनगर ,पंचवटी, नाशिक), किशोर बाबुराव वाकोडे (२२,रा. कथडा ,जुने नाशिक),राहुल अजय कुमार गुप्ता(२८,रा. शनी चौक पंचवटी, नाशिक),अविनाश गुलाब रणदिवे(२६,रा. सातपुर नाशिक),श्रीजय संजय खाडे( २३, रा. जुना आडगाव नाका पंचवटी नाशिक), जनार्दन खंडू बोडके (२२ रा. पंचवटी नाशिक सागर कचरू पवार (२८ रा.गणेशवाडी पंचवटी नाशिक), पवन दत्तात्रय पुजारी (२३, रा .तारवाला नगर पंचवटी नाशिक), महेंद्र उर्फ गणपत राजेश शिरसाट (२८ ,दत्त चौक पंचवटी नाशिक) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे तूर्तास टोळी युद्धाला विश्राम मिळाला आहे.