शहरात एम.डी विक्री करणारा टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार साथीदारासह अटक….एम.डी ड्रग्स विक्री करतांना अटक ….गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी

लाल दिवा-नाशिक,ता.१९ :- मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो, नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विकी व सेवन करणां-यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

त्याअनुषंगाने मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-यांची माहिती काढुन कडक करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हेशाखेला मार्गदर्शन केले होते. गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांची माहिती

काढत असतांना गुन्हेशाखेचे पोना/१८९४ मिलींदसिंग परदेशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती की, ” रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार निखिल पगारे हा एम.डी विक्री करतो व तो त्याचा साथीदार कुणाल घोडेराव हे एम.डी हा अंमली पदार्थ विक्री करण्या करीता हॉटेल वरांजलीच्या पाठीमागे, दामोदर नगर पाथर्डी शिवार नाशिक या ठिकाणी येणार आहेत.” अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, हेमंत नागरे, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा / महेश साळुंके पोना/मिलींदसिंग परदेशी, पोअं/विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे अशांचे पथक तयार करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन एम.डी विक्री करतांना इसम नामे १) निखील बाळु पगारे वय-२९ वर्षे रा- विक्रीभवन समोर पाथर्डीफाटा शिवार नाशिक, २) कुणाल उर्फ घा-या संभाजी घोडेराव, वय २२ वर्षे, रा- उत्तमनगर, सिडको नाशिक अशांना ताब्यात घेवुन त्यांच्या अंगझडतीत १,००,०००/-रूपये किंमतीची २० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) ही जप्त करण्यात आली असुन दोन्ही आरोपीतांविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास अंमली विरोधी पथकाचे सपोनि / हेमंत फड हे करीत आहेत.

निखील बाळु पगारे हा रेकॉर्ड सराईत गुन्हेगार असुन टिप्पर गँगचा सदस्य असुन त्याने त्याचा साथीदार मोहम्मद सैयद याचेकडे त्याचे ताब्यातील पिस्तोल विक्री करण्यासाठी दिले होते. त्यावरून मोहम्मद सैयद याचा शोध घेवुन त्याचे व निखील पगारे विरूध्द भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुरनं २४/२०२४ भा.ह.का. कलम ३/२५, ५/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात निखील पगारे हा पाहिजे आरोपी आहे.

गुन्हेशाखा युनिट १ व अंमली पदार्थ विरोधी पथक या गुन्हयांचा सखोल तपास करीत असुन सदर गुन्हयातील अटक आरोपी निखील बाळु पगारे व कुणाल संभाजी घोडेराव यांना एम.डी. (मॅफेड्रॉन) पुरवठा करणारा आनंद जायभावे हा असल्याचे निष्पन्न करून त्यांचा शोध चालु आहे. सदर गुन्हयातील एम. डी. (मॅफेड्रॉन) ही कोठुन आणले याचे पायमुळे शोधुन शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहेत.

 

नाशिक पोलीसांमार्फत नाशिक शहर हे एम. डी मुक्त करण्याबाबतचे धोरण मा. पोलीस आयुक्त साो, नाशिक शहर यांनी अवलंबिले असुन कोणीही अंमली पदार्थ विक्री व सेवन करू नये याबाबत सक्त आदेश दिले आहेत. सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त,

 

गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि/हंमत तोडकर, हेमंत नागरे, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा/शरद सोनवणे, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, रमेश कोळी, पोना/मिलींदसिंग परदेशी, पोअं/विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अनिरूध्द येवले, चासपोउनि / किरण शिरसाठ अशांनी केलेली आहे…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!