मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकानी केला रास्ता रोको…!

लाल दिवा-नाशिक,ता.२४ :- मनोज जरांगे पाटील यांनी सर्वत्र रास्ता रोको करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने आज नाशिक शहरांमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव फाटा पाथर्डी वडनेर रोड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आदर्श रस्ता रोको आंदोलन करिता मराठा समाजाचे केशव पोरजे, जगदीश पवार, राजू भगवंत पोरजे, मनोज सातपुते, आनंद बोराडे शिरसाट असे ४० ते ४५ मराठा बांधव सहभागी झाले होते.

आरक्षणाबाबत घोषणा देऊन मा. सहा पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन समाप्त झाले आहे.

  • घटनास्थळी शांतता असून वाहतूक सुरळीत झालेली आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!