मखमलाबादला विवाहितेची आत्महत्या. रंगपंचमीच्या दिवशी संपविले जीवन. नव-याच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल….!
प्रतिनिधी नाशिक
मखमलाबाद येथे राहत्या घरात गळफास घेत विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. नव-याचा त्रासाला कंटाळून ऐन रंगपंचमी च्या दिवशी दोन लहान मुलांना सोडून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.
म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मखमलाबाद, मानकर नगर येथील धनंजय बंगल्यात शनिवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान गळफास घेत कावेरी आशिष खोडे (३३) हिने आत्महत्या केली. तिचा नवरा आशिष भीमराव खोडे हा तिला मागील अनेक दिवसांपासून संशय घेत, मध्यपान करून शिवीगाळ करीत असे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून संयमाचा बांध सुटल्याने कावेरी हिने आत्महत्येचे पाऊल उचलले. कावेरी हिच्या पश्चात एक ३ वर्षाची लहान मुलगी व ८ वर्षाचा मुलगा आहे. कावेरी हीचा नवरा आशिष हा मुंबई महापालिकेत स्थापत्य अभियंता आहे. तर तिची सासू सिंधू खोडे ही माजी नगरसेविका असून सध्या काका पुंडलिक खोडे हे नगरसेवक आहेत. घटनेनंतर सासरच्या व्यक्तींनी माहेरच्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर बॉडी शासकीय रुग्णालयात दाखल करून निघून गेले. याबाबत ५ तास उलटूनही म्हसरुळ पोलीस दखल घेत नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत आरोपी आशिष खोडे यास अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
What’s your Reaction?
+1
1
+1
+1
+1
1
+1
+1
+1
2