अंबड व नाशिकरोड येथील दोन गुंडावर महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपारीची कारावाई….!
लाल दिवा-नाशिक,ता.२१ : श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणा-या इसमांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपारीची कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
त्यानुसार अनुक्रमे अंबड व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे दाखल असलेले १) इसम नामे आयुब अब्बास अली शेख, वय ४८, रा. फ्लॅट नं. १२, मोहनपार्क अपार्टमेंट हिंदुस्तान बेकरीमागे, केवलपार्क, नाशिक. २) सागर प्रकाश कांबळे, वय ३३, रा. सिन्नर फाटा, गोदरेजवाडी, नाशिकरोड, नाशिक यांनी अंबड व नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत दहशत कायम रहावी यासाठी त्यांनी महिलेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग करणे, मारहाण करणे, वाईट शिवीगाळ करणे, धमकी देणे, तसेच फोन करून शिवीगाळ, दमदाटी करणे, साथीदारांसह अनाधिकारे घरात प्रवेश करुन विनयभंग करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून घातक हत्याराने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धक्काबुक्की करुन जबरीचोरी करून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
वरील नमुद इसमांनी नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने त्यांचे विरूध्द श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना खाली, श्रीमती मोनिका नं. राऊत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर तसेच श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व श्री. आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी अनुक्रमे नमुद इसमां विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या व समाज स्वास्थ्य बिघडवणा-या गुन्हेगारांचा गुन्हयांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज चालू असून त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार तडीपार व एमपीडीए कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रकिया सुरू आहे. आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीतून ६१ गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच एमपीडीए कायदया अंतर्गत एकुण १० इसमां विरूध्द कारवाई करून त्यांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेले एकुण २३ गुन्हेगार इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्हयात सापडल्यास त्यांचे विरूध्द गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे.♦..