लाल दिव्याच्या बातमीनंतर…. महंत अनिकेत शास्त्री यांना मिळाली पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था…… शास्त्री यांच्याकडून लाल दिव्याचे अभिनंदन…..!
लाल दिवा : बुधवारी काही जणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्हत पोस्ट टाकल्यामुळे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत विशिष्ट समाजाच्या व धर्मीयांच्या लोकांनी एकत्र येत गदारोळ केला होता. यावेळी दगडफेक करून जाणाऱ्या मंहत अनिकेत शास्त्री यांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली. यासंदर्भात लाल दिव्याच्या माध्यमातून घटना समोर आणण्यात आली. अनिकेत शास्त्री यांनी यापूर्वी देखील सुरक्षा व्यवस्था मिळावी. याकरता अर्ज-फाटे केले होते. परंतु त्याची दखल घेण्यात आली नव्हती. मात्र लाल दिव्याच्या बातमी नंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन अनिकेत शास्त्री यांना पोलीस बंदोबस्त दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. या संदर्भात महंत शास्त्री यांना विचारले असता त्यांनी दैनिक लाल दिव्याचे आभार मानले आहे.
What’s your Reaction?
+1
1
+1
+1
+1
+1
1
+1
+1