पोलीस असल्याची बतावणी करून निवृत्त शिक्षकाला घातला एक लाखाचा गंडा : इगतपुरी शहरातील घटना …!
लाल दिवा-इगतपुरी : इगतपुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नाशिक येथे जाण्यासाठी निघाले असताना जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर २ या सोसायटिसमोर मोटरसायकल वर आलेल्या अज्ञात चोरट्याने चीमोटे यांना व त्यांच्या मागे येणाऱ्या त्याच्या साथीदाराला पोलिस असल्याची बतावणी करत पुढे एका कडे कट्टा सापडला आहे. तुमच्या गळ्यातील व हातातील चैन व अंगठी काढून माझ्याकडे द्या मी ती रुमालात तुम्हाला बांधून देतो असे सांगत त्यांच्याकडून चैन व अंगठी काढून रुमालात बांधत असल्याची बतावणी करत ते सुमारे एक लाख पाच हजारांचा ऐवज घेऊन मोटरसायकलस्वार व त्याच्या साथीदाराने पोबारा केला आहे. चोरटे निघून गेल्यावर चिमोटे यांनी रुमाल तपासला असता त्यात त्यांना चैन व अंगठी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या प्रकरणी इगतपुरी पोलिस स्थानकात जाऊन घटना सांगितली. दरम्यान ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी या दोन्ही अज्ञात चोरट्याविरुद्ध इगतपुरी पोलिस स्थानकात भादवी कलम ४१९, ४२०, १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटिव्ही च्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.