मॉर्फ केलेल्या “त्या” वादग्रस्त व्हायरल व्हिडिओ संदर्भात खासदार साहेबांची सायबर क्राईम मध्ये धाव…..!
नाशिक : खासदार यांच्याविषयी वादग्रस्त व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून, मॉर्फ व्हिडीओ करणाऱ्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यांच्यासंदर्भातील एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा खासदार दिल्ली येथे होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे. अधिवेशनाच्या
कालावधीत आपण व्यस्त असताना अज्ञात व्यक्तीने माझ्या बदनामीसाठी मॉर्फ केलेला व्हीडी तयार केला आणि तो व्हायरल केला आहे. या मॉर्फ केलेल्या व्हिडीओची सविस्तर चौकशी करून माझ्या बदनामीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार यांनी केली आहे. सायबर क्राइम विभागाच्या पोलिस
निरीक्षकांनादेखील यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये जळगाव येथील एका खासदाराच्या विरोधात असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पक्षाने त्याला उमेदवारीदेखील नाकारली होती. त्यावेळी हे प्रकरण बरेच गाजले होते.
माझ्यासंदर्भात मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करून हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात सायबर क्राइम विभागाकडे यांनी तक्रार केली आहे.
खासदार यांच्या संदर्भात फेसबुकवर आणि योद्धा ग्रुपवरील व्हायरल व्हिडीओसंदर्भात एका मोबाइल क्रमांक धारकाच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आला आहे. . .