जुळ्या ट्रकचा फसवा खेळ उघड; शासनाला लाखोंचा चुना!

२५ लाखांचे ट्रक जप्त, शासनाची फसवणूक उघड

लाल दिवा-नाशिक,दि.३:- (प्रतिनिधी) – एकाच क्रमांकाच्या दोन आयशर ट्रक वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या धूर्त इसमाला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट १ ने ही कारवाई करत २५ लाख रुपये किंतीचे दोन्ही ट्रक जप्त केले. अतिरिक्त भाराचा धंदा करून लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्तांपासून ते पोहवांपर्यंत सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदारांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली, उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट १ ने ही कारवाई यशस्वी केली. शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिरिक्त वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या महसूल बुडवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचाच एक भाग म्हणून ही धक्कादायक फसवणूक उघडकीस आली.

या कारवाईत गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, एकाच क्रमांकाचे (MH 04 KF 7114) दोन आयशर ट्रक स्कॅप मटेरियल भरून एक्सलो पॉइंटवरून ग्लॅस्को पॉइंटकडे जाणार असल्याचे पोलिसांना समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि चेतन श्रीवंत आणि पोहवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी आणि समाधान पवार यांच्या पथकाने सापळा रचला.

एक्सलो पॉइंटजवळ दोन्ही ट्रक आढळून आल्यावर चालक अताउल्ला बैतुल्ला चौधरी (रा. विराटनगर, अंबडलिंक रोड, नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने रॉयल्टी, टोलनाका आणि इतर कर बुडवण्यासाठी एकाच क्रमांकाच्या दोन ट्रक वापरण्याची कबुली दिली. या धंद्यातून तो दररोज हजारो रुपये कमावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चौधरीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात भारतीय द्याय संहिता कलम ३१८(२) आणि ३४१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त कर्णिक यांनी या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!