पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ यांचा महाराष्ट्र माझा ने “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार देऊन केला गौरव…. प्रमुख उपस्थिती : शर्मिष्ठा वालावलकर, डॉ. श्रीकांत सोनवणे, विनोद नाठे, ॲड. मिलिंद मोरे, दिनेश ठोंबरे आदीं…….!
लाल दिवा-नाशिक,ता.१२ : महाराष्ट्र माझा न्युज प्रथम वर्धापन दिन नवीन नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस विभाग, अँटी करप्शन विभाग, महानगरपालिका आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला व पुरुष अशा तब्बल 125 व्यक्ती विशेष निवडून, मानाचा भगवा फेटा बांधून महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या महाराष्ट्रात लेडी सिंघम नावाने प्रसिद्ध असलेल्या, अँटी करप्शन विभाग पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम उपस्थित, नवीन नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी तसेच उपायुक्त डॉक्टर मयूर जी पाटील, संचालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन तथा विभाग प्रमुख पत्रकारिता महाविद्यालयाचे डॉ. श्रीकांत जी सोनवणे सर भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सबंध महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ने हक्कासाठी लढा देणारे विनोद जी नाठे सर, महाराष्ट्र माझा न्युज चे कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद जी मोरे सर, नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघ दिनेश पंत ठोंबरे सर प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करताना महाराष्ट्र माझा न्युज च्या आयटी हेड जयश्री गायकवाड यांनी स्वतः बनवलेल्या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांच्या हस्ते न्यूज महाराष्ट्र माझा वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र माझा न्युज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र माझा न्युज प्रथम वर्धापन दिन साजरा करणे हे फक्त निमित्त आहे उपस्थित तळागाळातील जनतेला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अँटी करप्शन विभाग कशाप्रकारे काम करतो आणि जर कोणी सरकारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी आपल्या योग्य कामासाठी अनाधिकृत पैशाची मागणी करत असेल तर सर्वसामान्य जनतेने न घाबरता अँटी करप्शन विभागाला कशाप्रकारे संपर्क करावा, तसेच कोणत्याही शहरासाठी आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, स्वच्छता विभागात काम करणारे, परंतु ज्यांची कधीही दखल घेतली जात नाही. पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा आवल्यांचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आणि समाजातील इतरही घटकांनी यांच्या कामाची दखल घेतली पाहिजे असे सांगितले.
शर्मिष्ठा वालावलकर मॅडम सह सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रशासनातील अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र माझा न्यूज चे संपादक जनार्दन गायकवाड यांनी गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले याबद्दल सर्व पुरस्कारार्थीनी महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी भावसार यांनी केले.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री गायकवाड, स्वप्निल गायकवाड, भैय्यासाहेब कटारे, एडवोकेट मिलिंद मोरे, प्रशांत खरात, गौरव केदारे,सनी गायकवाड, गणेश सोनवणे, विवेक बनकर, भगवान खरे, राजेश भडांगे, बाळकृष्ण कदम, राजेंद्र दोंदे, रफिक सय्यद, पल्लवी भावसार, अंकुश शेवाळे यांचे सहकार्य लाभले.