नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांच्या आदेशाचीच होत आहे का अनादर? पोलीस स्टेशनजवळच खाजगी वाहनांवर ‘पोलीस’चा वापर!
लाल दिवा-नाशिक,दि.१८: एकीकडे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खाजगी वाहनांवर सरकारी नावे आणि चिन्हे लावण्यास सक्त मनाई केली असताना दुसरीकडे शहरातील एका पोलीस स्टेशनजवळच काही खाजगी वाहने ‘पोलीस’ असा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस आयुक्तांचे आदेश असतानाही त्यांच्याच विभागातील काही जणांकडून या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर येत असून यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार खाजगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘सरकार’, ‘अशा कोणत्याही प्रकारची नावे किंवा चिन्हे लावणे बेकायदेशीर आहे. मात्र, पोलीस स्टेशनच्या परिसरातच असे प्रकार घडत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.