दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरीचोरी या मालाविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेसाठी तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणेसाठी परिमंडळ – २ कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांची विशेष मोहीम…!
लाल दिवा-नाशिक,ता.९:अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारां विरुद्ध कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्यादृष्टीने, नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – २ मधील पोस्टे. हद्दीत दि. ०८/११/२०२३ रोजी १९.०० ते २२.०० वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविणे साठी श्रीमती मोनिका नं. राऊत,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर यांनी, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड व |नाशिकरोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.
- श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व श्री. आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग |यांनी अधिनस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन कोम्बिंग ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करून घेतलेली आहे.
- १. रेकॉर्डवरील तसेच तडीपार, असे एकुण १३५ गुन्हेगारांना चेक करुन, ६५ गुन्हेगारांचे चौकशीफॉर्म भरुन घेवून आवश्यक ती कारवाई करण्यांत आलेली आहे.
- २. ५० टवाळखोरां विरुध्द ११२/११७ प्रमाणे कारवाई केली आहे. ३. कोटपा कायदयान्वये अंबड व देवळालीकॅम्प पोस्टे. हद्दीत एकुण ०८ कैसेस करण्यांत आल्या आहे.
- ४. समन्स / वॉरंट मधील इसमांना चेक करून १२ इसमांना समन्स तसेच ०५ इसमांना वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.
रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार आहे. तसेच दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने परिमंडळ – २ कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत तसेच सातपुर, अंबड एमआयडीसी भागात नियमित बंदोबस्ता व्यतिरिक्त अधिकचे फिक्सपॉइन्ट बंदोबस्त, पायी तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची गस्त, असे विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यांत आलेले आहे. नागरिकांनी देखील आपले मौल्यवान सामानाची सुरक्षिततेतेसाठी खबरदारी घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी केले आहे