इगतपुरीत वृद्ध प्रवाशावर हल्ला; अजित पवार संतापले, दोषींना सोडणार नाही!
लालदिवा -नाशिक,दि.१:- मुंबई:राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून असामाजिक घटकांना कोणताही थारा मिळणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. इगतपुरी रेल्वे प्रवासादरम्यान एका वृद्ध प्रवाशाला मारहाणीच्या घटनेवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी अजित पवार म्हणाले की, “राज्यात अशा गुंडगिरीला थारा नाही. इगतपुरी रेल्वे प्रवासादरम्यान वृद्ध प्रवाशावर झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. या घटनेची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1