सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त – दोन कंटेनर हस्तगत….. इगतपुरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी !

लाल दिवा, ता. २६ : मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणारे दोन कंटेनर आज सकाळी दहा वाजता इगतपुरी पोलीसांनी पकडले असून सदर कंटेनरमधून सव्वा कोटी रूपयांचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलीस सदर कंटेनरसाठी सापळा रचून त्याचा शोध घेत होते. आज सकाळी गुटख्याने भरलेले सदरचे कंटेनर इगतपुरी परिसरात आले असता, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे व अंमलदारांनी सदरचे कंटेनर नं. HR-47 E-9140 व HR-38Z-3937 ताब्यात घेतले आहेत.

जप्त करण्यात आलेला गुटखा हा हरियाणा मधून भिवंडी येथे जात असल्याचे निदर्शनास आले असून, जप्त केलेल्या मालात ४ के स्टार आणि एस एच के या प्रतिबंधीत गुटख्याचे ब्रँडचा समावेश आहे.

 

सदर प्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं ११२ / २०२३ भादवि कलम ३२८, २७२, २७३, ४२०, १८८, ४६५, ४६८, ४७१, ३४ सह अन्न सुरक्षा मानके कायदा सन २००६ चे कलम ५९ अन्वये चार इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे हे करीत आहेत.

सदर प्रकरणात, आतापर्यंत सलमान आमीन खान, वय ३२, व इरफान आमीन खान, वय ३१, दोन्ही रा. नखरोला, ता. होडल, जि. जलवाल, हरियाणा यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ असून मागील काही वर्षांपासून ते गुटख्याचे कारभारात आहेत.

सदर प्रकरणी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पोलीस पथकास २५,००० रू. चे बक्षीस जाहीरकरून अभिनंदन केले आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!