तिकीट मिळाले नाही तर मैत्रीपूर्ण लढत…….निवृत्ती अरिगळे,….अजित पवार गटाकडून बंडखोरीची शक्यता..!
लाल दिवा : नाशिक लोकसभेचे वारे सध्या प्रचंड वेगाने वाहत असतानाच आता अजित पवार गटाने तिकिटासाठी मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली आहे तिकीट मिळाले नाही तर अजितदादांच्या परवानगीने मैत्रीपूर्ण लढत देऊन दाखवू असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिगळे
यांनी स्पष्ट केले. म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गट बंडखोरी करेल हे दिसून येत आहे.
नाशिकचे तिकीट शिंदे गटाला सुटणार की भाजपला की अजित पवार गटाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही हेमंत गोडसे यांनी तिसऱ्यांदा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले असले तरी भारतीय जनता पक्ष नाशिकच्या जागेवर ठाम आहे. अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते
निवृत्ती अरिगळे यांनी तिकीट मिळाले नाही तर अजित दादांच्या परवानगीने आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ, निवडून आल्यावर पुन्हा अजित पवार गटात जाऊ असा नारा दिला आहे त्यामुळे आता अजित पवार गट बंडखोरीच्या तयारीत दिसत आहे. ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही ते छुप्या पद्धतीने दबाव गट निर्माण करून निवडणुकीत किंगमेकर ची भूमिका बजावू शकतात असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे त्यामुळे महाराजांचे पुनर्वसन कसे करणार यासंदर्भात सध्या पक्ष पातळीवर हालचाली चालू आहे.
- प्रतिक्रिया.
नाशिक जिल्ह्यात अजितदादा पवारांचा मोठा गट राजकारणात सक्रिय आहे त्याला प्रतिनिधित्व मिळायला हवे.
तिकीट मिळाले नाही तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी आहे. आमच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते यासंदर्भात विचारविनिमय करीत असून लवकरच आमची भूमिका स्पष्ट केली जाईल.
–
- निवृत्ती अरिगळे.