शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध व्यक्तिला शिक्षा नाही झाली पाहिजे…!
लाल दिवा – तुरुंगात शिक्षा भोगत असणारा व्यक्ती म्हणजे कैदी आरोपी.गुन्हेगार होय. कोणीही आईच्या उदरातून आरोपी. कैदी गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही. समाजातील काही घटना मग त्या स्थावर. जंगम संपत्ती. घर.गाड्या.बंगले. व्यवसाय. आर्थिक लालसा. प्रेम प्रकरणातून, बलात्कार,मारामास्या,मानसिक आजार, बेरोजगारी. गरिबी. चैनी सवयी.अशा विविध कारणावरुन आरोपी. कैदी. आज समाजात कमी वयाचे तरुण तयार होत आहेत. राजकीय लोकांच्या सांगण्यावरून आर्थिक मदतीसाठी काही लोक जो अपराध आपणं केला नाही असे अपराध आपल्या अंगावर घेऊन आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. अशा ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य. तरुणांची नोंद जास्त आहे. बंद आंदोलन मोर्चे उपोषण यावेळी गुन्हे अंगावर घेणारे हे सर्व गरिब घरातील मुल असतात.कैदी आरोपी. सर्वजण नसतात ज्या ठिकाणी गुन्हा घडतो
त्यावेळी त्याठिकाणी गुन्हा करणार्या पेक्षा इतर लोकांना सुध्दा ज्याचा काही गुनहयाशी संबंध नाही आशा लोकांना विनाकारण आरोपी केले जाते. आणि त्याच्या नावावर गुन्हा नोंद करून त्यांनाही कैद केलं जातं.आणि विनाकारण त्यांना कोर्टात हेलपाटे मारावे लागतात.मुली सुध्दा मुलांना आपल्या खोट्या प्रेमात फसवून त्यांच्याकडून महागडं मोबाईल. प्रेजंट. कपडे, पैसा. उकळतात आणि जेव्हा हे सर्व देण्याचे तो मुलगा नाकारतो त्यावेळी त्यांच्या विरोधात खोटा बलात्कार गुन्हा. छेडछाड, असे आरोप दाखल करतात पोलिस मुलांची बाजू ऐकण्यासाठी तयार नसतात कारण महिलांना कायद्याने संरक्षण दिले आहे. यामुळे आज मुली पेक्षा शाळां कॉलेज महाविद्यालय यामध्ये शिक्षण घेणारी मुल धोक्यात आली आहेत. मुलींच्या तक्रार नुसार पोलिस मुलांच्या नावे गुन्हा दाखल करतात आणि येथूनच आरोपी कैदी तयार होण्यास सुरुवात होते. आपल्या एका सर्वे मध्ये असा अंदाज आला आहे. 50/ टक्के गुन्हे हे लैंगिक प्रकरणं, प्रेमप्रकरण. यातून होताना दिसतं आहेत. आज बाल गुन्हेगारी सुध्दा बोकाळली आहे. अल्पवयीन शिक्षा नाही यामुळे 18 वर्षाच्या आतील मुलाचा आज गुन्हेगारी मध्ये वाढता सहभाग आपणांस विचार करायला लावणारा आहे. म्हंजे शासनाच्या गलथानपणा पणामुळे आजही कैदी तयार होत आहे शासनाने दोघांचे गुन्हे काय आहेत गुन्हा करण्यास दोघ समान जबाबदार असल्यास दोघांना सजा शिक्षा समान मिळायलाच हवी तरच न्याय होइल आणि गुन्हेगारी संपले हे खरे.गरिबी हे सर्वात मोठे कारण आहे. आरोपी होण्यासाठी.कारणीभूत आहे. राहण्याचा प्रश्न. व्यसनी. चैनी सवय. पैसा.दवाखान्याचा खर्च. यासाठी लागणारी आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी लोका आज गुन्हे अंगावर घेण, सवता गुन्हा करण.लोकांचा खून. लुटमार. फसवणूक असे प्रकार आज आपणांस पाहावयास मिळत आहेत म्हंजे आरोपी आज सर्वत्र आहेत.गुन्हेगारीचा विचार करता पुढील काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत गुन्हेगारी उपजत नसून संपादन केलेली वर्तणूक असते. खिसा कसा कापायचा व गुन्हा करूनही निष्पापपणाचा आव कसा आणावयाचा याचे शिक्षण व त्या दृष्टीने सराव केल्याशिवाय खिसेकापूगिरी करता येणार नाही. माणसामाणसांच्या सहवासात राहूनच गुन्हा करण्याचे शिक्षण मिळते. घनिष्ट संबंध असलेल्यांच्या मार्फत गुन्ह्याचे शिक्षण घेणे सुलभ जाते. गुन्ह्याचे तंत्र, उद्देश,प्रयोजकता इ. सर्व शिकावे लागते. कायदेभंग, सामाजिक नीतिमूल्यांच्या विरोधी वर्तन किंवा नियमांचे उल्लंघन करण्यासारखे वातावरण व व्यक्ती यांचा सहवास जितका जास्त, तितका गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळण्याचा संभव जास्त असतो.गुन्हेगार हा नेहमीच उपाशी किंवा गरजू असतो असे नाही. गुन्हा करण्याची सवय जड़ते आणि तिचे इतर व्यसनांप्रमाणे व्यसनामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. सामान्यजन साध्याप्रत जाण्यासाठी जसा साधनांचा अवलंब करतो, तसाच गुन्हेगारही इच्छित साध्य करण्यासाठीही गुन्हा करताना आढळतो. समाविष्टतेच्या सिद्धांतानुसार व्यक्तीची अंतर्गत कुवत बाह्य वातावरणातील प्रलोभनांना वा दुर्व्यवहारांना बळी न पडता आत्मविश्वासाने समाजमान्य वर्तन करण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरते; त्यावेळी व्यक्ती गुन्हेगार होत नाही. बाह्य समाजविरोधी घटकांच्या प्रभावाने आत्मसंयम, धैर्य, आत्मविश्वास ढळू न देण्याची शक्ती तिच्यात समाविष्ट झालेली असते. गुन्ह्याला प्रवृत्त करणाऱ्या बाह्य शक्तींशी सामना करण्याची व्यक्तीची कुवत किती आहे, यावर गुन्हेगारी वर्तन अवलंबूनअसते. समाज व सामाजिक संस्था यांच्यामार्फत होणाऱ्या व्यक्तीवरील संस्कारांवर गुन्हेगारीचे प्रमाण निर्भर असते. मूल्यसंघर्ष व व्यवहारसंघर्ष यांमुळे आचारविचार यांत विसंगती निर्पूर्वी कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला, की फक्त त्या कृत्यावरूनच तिला शिक्षा होत असे. गुन्हा करणारी व्यक्ती कोण, त्या व्यक्तीची गुन्ह्याच्या बाबतीत कितपत जबाबदारी आहे, त्या व्यक्तीची मानसिक अथवा शारीरिक ठेवण कशी आहे, तिची आनुवंशिक पूर्वपीठिका काय आहे इ. गोष्टींचा विचार जुन्या काळी होत नसे. गुन्हेगारीचे एक शास्त्र आहे, असे सिद्ध झाल्यावर यासंबंधी साकल्याने विचार होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या शास्त्राचा पाया घातला गेला. हा पाया घालणाऱ्यांपैकी प्रमुख म्हणजे इटलीतील शास्त्रज्ञ लोंब्रोसो होय. त्याच्याच कार्याला साहाय्यभूत झालेले आणखी शास्वज्ञ म्हणजे फेन्य व गारॉफालो होत. या तिघांनीही या शास्त्राचा पाया घातला. लोंब्रोसो याचा जन्म १८३५ मध्ये झाला व १८७२ साली वैद्याच्या शरीरमापनावर त्याने पहिले पुस्तक लिहून गुन्हेशास्त्राचा पाया घातला. १८२५ मध्ये फ्रान्समध्ये गुन्हेगारीविषयक आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू झाले होते. त्यानंतर दहा वर्षांनी कटले याने यासंबंधी एक पुस्तक लिहिले. कटले याला गुन्हेगारी सांख्यिकीचा जनक समजण्यात येते. मानसिक लक्षणांवर भर दिला. फेन्य या शास्त्रज्ञाने मानवशास्त्र, मानसशास्त्र, दंडशास्त्र आणि सांख्यिकी या सर्वांचा आधार घेऊन गुन्हेगार या व्यक्तीची छाननी केली नैमित्तिक व त्याने वेडा, जन्मजात, रुळलेला, विकारवश असे गुन्हेगारांचे पाच प्रकार केले. तसेच दाट लोकसंख्या, सामाजिक व धार्मिक चालीरीती, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षण, औद्योगिक उत्पादन, मद्यसेवन, आर्थिक व राजकीय संस्था, पोलीस व न्यायसंस्था या सर्वांचा गुन्हेगारीवर कसा परिणाम होतो, हे दाखवून दिले. जर्मन शास्त्रज्ञ आशाफोन्य बर्ग याने स्वतःचे एक निराळे गुन्हेगारांचे वर्गीकरण केले आहे. इंग्रज शास्त्रज्ञ एलिस याने आणखी एक वर्गीकरण केले आहे. पारमेली या शास्त्रज्ञानेही एक वर्गीकरण केले आहे. एलवुड आगस्ट, ड्राहमस, प्रोगिलीन यांनीही आपापली वर्गीकरणे केली आहेत. गुन्हेगार म्हणून काही खास वैशिष्ट्ये असलेली व्यक्ती असते, असे अलीकडे मानले जात नाही, सदरलँडच्या मते गुन्हा करणारा वर्ग निश्चित करणे अशक्य आहे. तसेच मानसिक अथवा राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने गुन्हेगार आणि निर्दोष या दोहोंमध्ये खास वेगळेपण असते असेही नाही. यूरोपीय देशांत गुन्ह्यांचे मूळ आनुवंशिक गुणांच्या आधारे शोधण्याचा कल जास्त आहे. अमेरिकेत
परिस्थितिजन्य घटकांवर जास्त भर दिला जातो. सदरलँडच्या मते गुन्हेशास्त्राचे पाच संप्रदाय आहेत. जुना संप्रदाय १७७५ साली सुरू झाला. प्रत्येक इसम सुखकारक अथवा दुखकारक परिणामांचा विचार करून स्वेच्छेने गुन्हा करतो, हे या संप्रदायाचे मत. बेकारिआ याने हे तत्त्व आपल्या दंडशास्त्रात मान्य केले व शिक्षेचे परिणाम अधिक दुखकारक असल्याशिवाय गुन्ह्याची प्रवृत्ती नष्ट होणार नाही, असे प्रतिपादन केले. त्यासाठी गुन्हा व त्याची शिक्षा या दोहोंची आगाऊ कल्पना लोकांना असली पाहिजे, हे मत त्यांनी मांडले आहे.१९१५ साली सुरू झाला. लिस्ट, प्रिन्स फान हेमह, फाइन् टस्की वगैरेंनी असे मत मांडले, की सामाजिक परिसराच्या परिणामांतून गुन्हेगारी निर्माण होते. सदरलँडच्या मते गुन्ह्यात सात कल्पना अंतर्भूत
आहेत गुन्ह्याच्या कृत्यापासून काहीतरी बाह्य परिणाम अथवा नुकसान झाले पाहिजे. ते कायद्याने निषिद्ध असले पाहिजे. ते कर्त्याची काही एक प्रवृत्ती अथवा निवृत्ती दाखविणारे पाहिजे. त्यामागे कर्त्याचा दुराशय पाहिजे. (कर्त्याची वागणूक व दुराशय यांमध्ये मेळ असला पाहिजे. (कृत्य व नुकसान यांमध्ये कार्यकारणभाव पाहिजे. उदा., अ ने बला गोळी मारली. त्यामुळे तो जखमी झाला. नंतर तो सुधारत असता हृदयक्रिया बंद पडून मरण पावला; तर यांत गोळी मारणे व मृत्यु घडणे यांमध्ये कार्यकारणभाव नाही. शेवटी अशा कृत्यास कायद्याने मंजूर अशी शिक्षा पाहिजे. सामाजिक दृष्ट्या गुन्हा म्हणजे एक विसंवाद अथवा विघटन आहे. गारॉफालोची व्याख्या वर सांगितलेलीच आहे. रेडक्लिफ ब्राउन याने गुन्हा म्हणजे शिक्षेस पात्र असा समाजसंकेत अथवा रीतिभंग अशी व्याख्या केली आहे. त्याच्या मते गुन्ह्यात तीन कल्पना अंतर्भूत आहेत सत्ताधारी वर्ग काही मूल्यांचा आदर करतो,दुसऱ्या काही व्यक्ती या मूल्यांचा अनादर करतात आणि सत्ताधारी वर्गतो आदर कायम राखण्यासाठी या दुसऱ्या व्यक्तींवर बळजबरी करतो.गुन्हेगारीचा उगम दारिद्र्य, घरटंचाई, गलिच्छ वस्ती, करमणुकीच्या साधनांचा अभाव, मानसिक दुर्बलता, अस्थिरता, विकारवशता यांमधून होतो हे खरे; पण हे पूर्ण सत्य नव्हे. श्रीमंत अथवा मध्यम वर्गात वरील कारणे आढळत नसूनही त्यांत गुन्हेगारी आढळून येते. गुन्हेगारीचे मूळ शोधताना दोन दृष्टिकोणांतून विचार केला पाहिजे परिस्थिती अथवा घटना आणि काही जण खास आपली समाजव्यवस्था. दैनंदिन जीवन. चैनी सवयी यामुळे सुध्दा कैदी झालेले आपण बघतो.
व्यक्तिमत्त्व. दुकानदाराच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन एखाद्या इसमाने
दुकानांत चोरी. दरोडा असा प्रकार होणे. यासाठी सुध्दा परिस्थिती जबाबदार आहे.
गुन्हेगारीला काही क्षेत्रे अनुकूल असतात, असे दिसते. खेड्यांपेक्षा शहरांत व औद्योगिक वस्तीत, तसेच श्रीमंत वस्तीपेक्षा गरीब अथवा गलिच्छ वस्तीत गुन्हे जास्त होतात. स्पर्धा, स्वार्थ व आर्थिक संघर्षाचा हा परिणाम होय. तथापि अमेरिकेत जबरी संभोगाच्या गुन्ह्याचे जे प्रमाण शहरांत आढळते, तेच खेड्यांतही आहे. मात्र तेथील खेड्यांत खुनांचे प्रमाण जास्त आहे, तर शहरांत चोरीदरोड्याचे प्रमाण जास्त आहे. तरीही अमेरिकेत दळणवळण व यांत्रिकीकरण या बाबतींत शहरे व खेडी यांत फारसा फरक नाही, ही वस्तुस्थिती महत्त्वाची आहे. शिकागोसारख्या ठिकाणी गुन्हेगारी संघटित झाली आहे. दरोडेखोरी, खून वगैरेंचे बाळकडू मिळालेली माणसे टोळीत राहून जीवन व्यतीत करीत आहेत. जीव आणि मत्ता यांबद्दल कदर नसलेली माणसे कायद्याला कस्पटासमान मानून धाडशी जीवन जगत आहेत. अशा ठिकाणी पालक-शिक्षक संस्था, चर्च अगर इतर धार्मिक संस्था किंवा सहकारी जीवनाचा आदर्श पाळणाऱ्या संस्था हतबल झाल्या आहेत आणि अशीच क्षेत्रे गुन्हेगारीला पोषक असतात. अशा क्षेत्रांत बाहेरचे गुन्हेगार आपल्या फायद्याकरिता घुसतात आणि संपर्काने नवीन गुन्हेगार तयार होतात. रोगाप्रमाणेच गुन्हेगारीही संसर्गजन्य आहे. टोळीमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला, त्यांपैकी प्रत्येकास आपण शूर आहोत, हे दाखविण्यासाठी गुन्हा करावा लागतो. गुन्ह्यातून आर्थिक फायदा घेण्यासाठी संघटक लहान मुलांना गुन्हा करण्याचे शिक्षण देऊन त्यांच्या टोळ्या बनवितात आणि त्यांत नवीन सभासदांची भर पडत जाते. घरातील वातावरणाचा आणि गुन्हेगारीचा, विशेषतः बालगुन्हेगारीचा, फार संबंध आहे. प्राचीन जमातींत जीवन साधे होते. आजचे जीवन फार गुंतागुंतीचे झाले आहे. ज्या कुटुंबात काही घटक गुन्हेगार आहेत अथवा मातापित्यांपैकी एकाचा अभाव आहे किंवा अज्ञान अथवा आजारपणासाठी उपचारासाठी पैशांची चणचण मग त्यासाठी एकादा आरोपी. गुन्हेगार कैदी होतांना दिसते.
गुन्हेगारी व सामाजिक प्रभाव केंद्रे यांचा संबंध पहाणे उद्बोधक आहे. कुटुंब, आर्थिक व्यवहार, राजसत्ता, शिक्षण व धर्म ही सामान्यतः सामाजिक प्रभाव केंद्रे मानण्यात येतात. पैकी कुटुंबाचे महत्त्व आपण वर पाहिले आहे. आर्थिक परिस्थितीच्या दबावांमुळे गुन्हेगारी संभवते, याचाही उल्लेख आलेला आहे. जितका आर्थिक दर्जा खालावलेला, तितका गुन्हेगारीला वाव जास्त, असे आढळून आले आहे. शिवाय आर्थिक जगात फसवेगिरी व स्वार्थमूलक गुन्हे नेहमीच उद्भवतात. म्हणजे सगळ्या आर्थिक स्तरांत गुन्हे हे आहेतच; त्यांचे प्रकार व जाती निरनिराळ्या असतील. गरज, लोभ आणि महत्त्वाकांक्षा या तीन बाबी सर्व स्तरांत गुन्हेगारीची उगमस्थाने बनतातराजेशाही, लोकशाही, हुकूमशाही, साम्यवादी वगैरे राजसत्तेचे प्रकार आहेत. राजसत्तेने घालून दिलेले नियम तोडणे ही गुन्हेगारी होय. राजकारणातील संघर्ष, तत्त्वप्रणालींचा संघर्ष यांमुळे कायदेभंगाची परिस्थिती उद्भवते. शिवाय राजकारणात पक्षपात, भ्रष्टाचार वगैरेंमुळे गुन्हेगारी फोफावते. मते गोळा करण्यासाठी, सत्ता काबीज करण्यासाठी अनेक गैरव्यवहार केले जातात. कायद्याची कडक अंमलबजावणी होऊ नये, अशी व्यवस्था केली जाते. विशिष्ट वर्गावर अन्याय घडतो व त्यामुळे असा दुखावलेला वर्ग संघर्ष सुरू करतो, राजकारण ही सेवा नसून धंदा होऊन बसतो. धार्मिक संस्था ज्या वेळी नैतिक मूल्ये समाजमनावर ठसवून कायदेशीर वर्तनास अनुकूल वातावरण तयार करतात, त्या वेळी गुन्हेगारीची वाढ खुंटते. अमुकच धर्माचे लोक जास्त अथवा कमी गुन्हे करतात, असा नियम नाही. त्याचप्रमाणे चर्चमध्ये अगर देवळात न जाणारे लोक अधिक प्रमाणात गुन्हेगार असतात, असेही नाही, तथापि धर्म आणि अंधश्रद्धा या कारणांवरूनही जगात प्राचीन काळापासून अनेक गुन्हे घडलेले आहेत. शिक्षणसंस्थांनी कुटुंबसंस्थेप्रमाणे आर्थिक विषमता यामुळे सुध्दा गुन्हेगारी पोसताना आपणास पहावयास मिळते. कोणी व्यक्ती आरोपी. गुन्हेगार. कैदी. होत नाही त्यासाठी
कारणीभूत असते ती त्यावेळी त्या व्यक्तिची परिस्थिती समाजाची. मित्राची. कुटुंबाची. त्या व्यक्तिला मिळणारी वागणूक सुध्दा कारणीभूत असते. आरोपी असेल कारावास भोगलेला व्यक्ती असेल त्याला व त्याच्या कुटुंबाला समाज अतिशय हिन वागणूक देताना आपणं बघतो. असं वागणं या सर्व लोकांना आपल्या या आणि अशा वागण्यातून बाहेर पडण्यास समान वागणूक न दिल्यामुळे आरोपी. कैदी. गुन्हेगारीचे. प्रमाणात वाढताना आपणांस पहावयास मिळत आहे.