घरफोडी करणारे चोरटे देवळा पोलीसांनी केले जेरबंद…!
लाल दिवा -नाशिक,दि.१७: देवळा पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे शांताराम राजाराम निकम रा सप्तश्रृंगीनगर देवळा ता देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम ४५४, ३८०, ३४ प्रमाणे दिनांक ०४.१०.२०२३ रोजी गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक श्री दिपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि कैलास शंकर गुजर हे करीत होते. सदर गुन्हयाचा तपासाबाबत मा शिवाजी उमाप सर मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, श्रीमती. माधुरी केदार – कांगणे मा. अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मा. संजय बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कैलास गुजर, पोना राहुल शिरसाठ, मपोना गोसावी, पोकॉ योगेश जामदार, शरीफ शेख मपोकॉ पवार यांचे पथक तयार करून सदर पथकाने घरफोडी तपास सुरु केला.
घरफोडीतील आरोपी सागर खंडेराव पिंपळकर वय २० वर्षे रा. रा. निवाणे ता. कळवण हल्ली सप्तश्रृंगीनगर देवळा ता देवळा हा सुमारे ०५ वर्षापासुन फिर्यादी यांचे घरात भाडेकरु म्हणुन राहत होता. तो फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यापासुन सतत फिर्यादी यांचे सोबत असत त्याच्या हलचाली पोलीसांना संशयास्पद वाटत असल्याने त्याच्यावर पाळत ठेवुन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा जोडीदार ज्ञानेश्वर संजय वाघ वय १९ वर्षे रा. सप्तश्रृंगीनगर देवळा ता देवळा याचे सोबत फिर्यादीचे बंद घराचा कुलुप व कडीकोंडी तोडुन घरात प्रवेश करुन सुमारे ५, ५४,४०० रु किमंतीच्या सोन्या चांदीचे दागीणे व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन चोरुन नेली होती बाबत कबुली दिली आहे आरोपींनी सदर घरफोडीतील सोन्या चांदीचे दागीणे कळवण, देवळा व मालेगाव येथे सराफ दुकानदारांना चोरीचे दागीणे विकले होते पोलिसांनी आरोपींकडुन सोन्या चांदीचे दागीणे व रोख रक्कम असे ४,५८,४०० रु. हस्तगत केली आहे. सदर आरोपी यांना मा. न्यायालय कळवण यांनी सदर आरोपींना ०३ दिवस पोलिस कोठडी सुनावली असुन मा दिपक पाटील सहा पोलीस निरीक्षक यांचे मार्गदशर्नाखाली पुढील तपास पोउनि कैलास गुजर व पो. कॉ. योगेश जामदार हे करी आहेत