शेअर मार्केट मध्ये पैसे लावण्यासाठी उच्चभू वस्तीत घरफोडी करणार हायप्रोफाईल सराईत गुन्हेगार जेरबंद………गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी……!

लाल दिवा-नाशिक,ता.३ : दिनांक २४ डिसेंबर २३ रोजी दुपारी १२:३० ते ४:१५ वाजेच्या दरम्यान गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत शरण बंगलो शारदा नगर, गंगापुररोड नाशिक या ठिकाणी अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी यांचे पाठीमागील किचनच्या ग्रील कट करून त्यावाटे आत प्रवेश करून घरातील मुख्य बेडरूम मधील कपाटातील तिजोरी, त्यातील रोख रक्कम, सोन्याचे दागिणे व घरातील टिसो कंपनीचे घडयाळ, एअरपॉड असा एकुण २,४१,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता म्हणुन त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने गंगापुर पोलीस स्टेशन कडील । गुरनं ३१५/२०२३ भादविक ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क.१ चे पथक यांनी सुरू करून घटनास्थळा वरील तसेच आजु बाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी हे वापी, गुजरात परिसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सपोनि हेमंत तोडकर, सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा /१३१६ नाझीम पठाण, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोना/१९०० विशाल देवरे, पोअं/२१५४ राहुल पालखेडे अशांनी वापी गुजरात येथे जावुन आरोपीतांचा शोध घेतला. आरोपी हे एका हॉटेलवर थांबले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन गुन्हयातील संशयित आरोपी नामे १) रोहन संजय भोळे, वय-३६वर्षे, रा- उपनगर नाशिक, २) ऋषीकेश उर्फ गुडडू मधुकर काळे, वय-२७वर्षे, रा- नाशिकरोड, नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाबाबत माहिती विचारली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली व त्यांचे कब्जात गुन्हयातील चोरीस गेलेले फिर्यादीचे अॅपल कंपनीचे एअरपॉड व टिसो कंपनीचे घडयाळ तसेच फिर्यादी यांची चोरीस गेलेली बॅग मिळून आली आहे. तसेच आरोपी यांनी गुन्हयात वापरलेली स्विप्ट डिझायर कार क्रमांक एम. एच ०५-सी.बी-३८४० ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर कार चोरी बाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुरनं २५३/२०२३ भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारमध्ये घरफोडी करण्याकरीता वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य ज्यात लोखंडी कटवणी, स्कु ड्रायव्हर, ग्रॉयडर मशिन, करवत, गॅसगण व गॅसचे एक छोटे सिलेंडर असे साहित्य मिळुन आले आहे. तसेच सदर गुन्हयात आरोपींना अटक करून तपास करत असतांना आरोपीतांकडुन गुन्हयातील ३० ग्रॅम सोनेसह एकूण ७,५३,२००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदरचे आरोपी हे हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी यापुर्वी नाशिक शहरातील उच्चभू वस्तीतील बंद बंगल्याची टेहाळणी करून नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यांचेकडून आज पावेतो तपासात खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

१) गंगापुर पो.स्टे कडील। गुरनं ३१५/२०२३ भादविक ४५४, ३८० प्रमाणे २) गंगापुर पो.स्टे कडील गुरनं ३१७/२०२३ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे

 

३) ओझर पो.स्टे कडील गुरनं. २५३/२०२३ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयात घरफोडी चोरी करून घरात

 

असलेली कारची चावी घेवुन कार चोरी केली आहे.

 

४) सिन्नर पो.स्टे कडील गुरनं ८२१/२०२३ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपी रोहन संजय भोळे हा नाशिकरोड पो. स्टे कडील गुरनं. २१५/२०२२ भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे मधील पाहीजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

सदर गुन्हयाचा तपास पोउनि / चेतन श्रीवंत, गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर हे करीत असुन आरोपीतांची पोलीस कस्टडी घेण्यात आली असुन त्यांचेकडुन आणखी नाशिक शहरात करण्यात आलेल्या घरफोडया चो-या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक सो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा.डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, पोउपनि / विष्णु उगले, सपोउनि/रविंद्र बागुल, पोहवा /१३१६ नाझीम पठाण, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा /१८८३ विशाल काठे, पोहवा /१५०६ शरद सोनवणे, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोना/१९०० विशाल देवरे, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, पोअं २२६० जगेश्वर बोरसे, पोअं/२४५० राजेश राठोड, पोअं/८५ समाधान पवार अशांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!