परिमंडळ – २ मधील उपनगर येथील महिलेवर हद्दपारीची कारवाई…
लाल दिवा-नाशिक,ता.१४ : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणा-या गुन्हेगारांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपारीची कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
त्यानुसार उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे दाखल असलेली महिला नामे भारती साहेबराव आहिरे, वय ४५, रा. भारती रो. हाउस नं. ०२, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक. हिने उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत कायम रहावी यासाठी तिने सर्वसामान्य नागरिकांची साथीदारांसह फसवणूक करणे, साथीदाराचे मदतीने कुरपणे वागणूक देवून मारहाण | करून शिवीगाळ व दमदाटी करणे, अनधिकृतपणे घरात प्रवेश करून विनयभंग करणे, अब्रु नुकसानीची धमकी देवून खंडणी मागणे, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागणे, मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करणे, करून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
वरील नमुद महिलेने नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने तिचे विरुध्द श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना खाली, श्रीमती मोनिका नं. राऊत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर तसेच श्री. आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी नमुद महिले विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीची कारवाई केलेली आहे.
नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या व समाज स्वास्थ्य बिघडवणा-या | गुन्हेगारांचा गुन्हयांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज चालू असून त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार तडीपार व एमपीडीए कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक | कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ – २ हद्दीतून ६१ लोकांवर | तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ – २ हद्दीत | हद्दपार आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आले म्हणून एकुण २० गुन्हेगार इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्हयात सापडल्यास त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे