३,६६,७०,६९७ रुपये किंमतीचा जप्त मुद्देमाल पोलीस आयुक्त यांचे हस्ते फिर्यादी यांना परत केल्याने नागरिकांमध्ये समाधान….!
लाल दिवा : पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीकोनातुन मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मागील गेल्या वर्षा भरात दाखल मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सर्व पोलीस ठाण्यांचे तसेच गुन्हेशाखा युनिट १, २ व मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेवुन गुन्हे उघडकीस आणुन त्यातील आरोपीतांकडुन गुन्हयातील चोरलेला किंमती माल हस्तगत केला आहे. त्यामध्ये,
असा एकुण ३,६६,७०,६९७/-रुपये किंमतीचा मुद्देमाल.
वरील मुद्देमाल मा. न्यायालयाचे आदेशान्वये तसेच सी.आर.पी.सी १०२ (३) प्रमाणे आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी समारंभ पुर्वक रेझिंग डे च्या दिवशी मा. श्री. संदिप कर्णिक साो., पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना भिष्मराज सभागृह, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रमा दरम्यान सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
यापुर्वी देखील नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणुन त्यातील जप्त मुद्देमाल ०८ वेळा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेवुन त्यामध्ये एकुण ९,१४,०१,३९९/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे.
आजच्या कार्यक्रमाचे वेळी उपस्थिती फिर्यादी पैकी फिर्यादी नामे सौ. दर्शना अढावु, सौ. स्नेहल येलमल्ले, श्री. मंगेश काजे, श्री. सुनिल यादव, श्री. नितीन गवांदे, श्री बापु सुर्यवंशी, श्री कैलास वाघ, श्री पवण शर्मा, अशांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पोलीस खात्या विषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमामध्ये मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व विशा., मा. श्रीमती मोनिका राउत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोउनि / धनराज पाटील यांनी केले. प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, गुन्हेशाखा युनिट क १, यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांनी केले.
सदर कार्यक्रम मा.श्री. संदिप कर्णिक पोलीस आयुक्त सोो. नाशिक, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री. प्रशांत बच्छाव सो., पोलीस उप आयुक्त, गुन्हे व विशा., मा. श्रीमती मोनिका राउत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, यांचे उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमास सर्व सहा. पोलीस आयुक्त, तसेच सर्व पोलीस स्टेशनचे व शाखेचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल कारकुन व पोलीस अंमलदार आणि ज्या गुन्हयातील मुद्देमाल वाटप करण्यात आला आहे त्या गुन्हयाचे फिर्यादी व नाशिक शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थितीत होते.